भाजप आंदोलनात जखमी झालेल्या शक्तिमान घोडयाचा मृत्यू
By Admin | Updated: April 20, 2016 18:31 IST2016-04-20T18:15:32+5:302016-04-20T18:31:53+5:30
भाजप आंदोलनाच्यावेळी गंभीर जखमी झालेल्या शक्तिमान घोडयाचा अखेर मृत्यू झाला आहे.

भाजप आंदोलनात जखमी झालेल्या शक्तिमान घोडयाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. २० - भाजप आंदोलनाच्या वेळी गंभीर जखमी झालेल्या शक्तिमान घोडयाचा अखेर मृत्यू झाला आहे. डेहराडूनमध्ये सरकार विरोधी आंदोलन करताना भाजपा आमदार गणेश जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत शक्तिमान जखमी झाल्याचा आरोप होता.
जोशींना या प्रकरणी अटकही झाली होती. तर शक्तिमान खड्डयात पाय अडकून पडल्याचा आणि जखमी झाल्याचा दावा जोशींनी केला होता.
लगेचच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्याला कृत्रिम पाय बसवण्यात आला होता. या कृत्रिम पायावर शक्तिमान उभा राहिल्याचेही फोटो प्रसिद्ध झाले होते.