आनंद साजरा करण्यासाठी हवेत केलेल्या गोळीबारात नवरदेवाचा मृत्यू
By Admin | Updated: February 18, 2016 10:59 IST2016-02-18T09:52:29+5:302016-02-18T10:59:19+5:30
वरातीत नाच गाणे सुरु असताना आनंदाच्या भरात काही अतिउत्साही नातेवाईक, मित्रमंडळीनी हवेत केलेल्या गोळीबारीत नवरदेवाचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील सीतापूरमध्ये घडली आहे.

आनंद साजरा करण्यासाठी हवेत केलेल्या गोळीबारात नवरदेवाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
सीतापूर - लग्नाच्या वरातीत नाच गाणे सुरु असताना आनंदाच्या भरात काही अतिउत्साही नातेवाईक, मित्रमंडळीनी हवेत केलेल्या गोळीबारीत नवरदेवाचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील सीतापूरमध्ये घडली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली.
वरात लग्नमंडपाजवळ पोहोचताच वरातीतीतल काही जणांनी हवेत गोळीबार सुरु केला. त्यावेळी अचानक एक गोळी घोडयावर बसलेल्या नवरदेवाच्या डोक्यात घुसली आणि तो जागीच कोसळला. नवरदेवाला लगेच सीतापूर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
तिथल्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर लखनऊ येथे नेण्यास सांगितले. लखनऊ येथे नेत असताना वाटेतच नवरदेवाचा दुर्देवी मृत्यू झाला आणि आनंदाचे वातावरण दु:खामध्ये बदलून गेले. गोळीबार करणा-याची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींची जबानी नोंदवून घेतली.