१० रुपयाच्या कॉईनवरुन हॉटेल मालकाच्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू

By Admin | Updated: November 4, 2016 09:19 IST2016-11-04T09:14:25+5:302016-11-04T09:19:50+5:30

महेंद्र यांनी शुक्रवारी रात्री क्रिष्णा ढाबा हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण केले. त्यांचे एकूण बिल १६० रुपये झाले. बिलाची रक्कम अदा करताना महेंद्र यांनी नोटा देण्याऐवजी..

Death of a hotel owner by killing hotel owner on 10 rupee cone | १० रुपयाच्या कॉईनवरुन हॉटेल मालकाच्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू

१० रुपयाच्या कॉईनवरुन हॉटेल मालकाच्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू

 ऑनलाइन लोकमत 

कानपूर, दि. ४ - हॉटेलमधल्या जेवणाचं बिल भरताना नोटांऐवजी सुट्टया पैशाची नाणी दिली म्हणून हॉटेल मालकाने केलेल्या बेदम मारहाणीत महेंद्र (३५) यांचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेशच्या कानपूर देहातमधील मुगीसापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 
 
महेंद्र यांनी शुक्रवारी रात्री क्रिष्णा ढाबा हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण केले. त्यांचे एकूण बिल १६० रुपये झाले. बिलाची रक्कम अदा करताना महेंद्र यांनी नोटा देण्याऐवजी १० रुपयांची नाणी पुढे केली. पण हॉटेल मालक सिंहने नाण्याच्या स्वरुपात बिलाची रक्कम घेण्यास नकार दिला. 
 
त्याने नोटा देण्यास सांगितले. यावरुन झालेल्या वादातून सिंहने महेंद्र यांना लोखंडी सळीने मारहाण केली. त्यात जबर जखमी झालेल्या महेंद्र यांचा सोमवारी मृत्यू झाला. डेरापूर पोलिस स्थानकात सिंह विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, तो फरार आहे. 
 

Web Title: Death of a hotel owner by killing hotel owner on 10 rupee cone