शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये ‘कप्पा’ विषाणूच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू; डेल्टा प्लसचाही फैलाव, वैद्यकीय यंत्रणा सतर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 12:13 IST

कप्पा विषाणूच्या संसर्गाने मरण पावलेल्या रुग्णाचे वय ६६ वर्षे असून ही घटना संत कबीरनगर येथे घडली.

लखनऊ  : डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण उत्तर प्रदेशमध्ये सापडल्यानंतर आता त्या राज्यात कोरोनाच्या कप्पा विषाणूने बाधित एका रुग्णाचे निधन झाले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील वैद्यकीय यंत्रणा अत्यंत सतर्क झाली आहे.कप्पा विषाणूच्या संसर्गाने मरण पावलेल्या रुग्णाचे वय ६६ वर्षे असून ही घटना संत कबीरनगर येथे घडली. बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख अमरेश सिंह यांनी सांगितले की, या रुग्णाला कोरोना झाल्याचे २७ मे रोजी केलेल्या चाचणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला १२ जून रोजी बीआरडी महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. जिनोम सिक्वेन्सिंगच्या निष्कर्षातून १३ जूनला असे आढळले की, या रुग्णाला कप्पा विषाणूची बाधा झाली आहे. या रुग्णाने उत्तर प्रदेशच्या बाहेर कुठेही प्रवास केलेला नव्हता. 

केरळमध्ये झिका विषाणूचे १४ रुग्णकेरळमध्ये झिका विषाणूच्या संसर्गाचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तेथील वैद्यकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. हा विषाणू डासाच्या माध्यमातून माणसांमध्ये संक्रमित होतो. केरळमध्ये या विषाणूची लागण सर्वप्रथम एका गर्भवती महिलेला झाली. त्यानंतर असे अजून १३ रुग्ण त्या राज्यात सापडले. या विषाणूच्या संसर्गाची लक्षणे डेंग्यूसारखीच असतात. त्यात रुग्णाला ताप येतो, सांधे दुखतात.

उत्तर प्रदेशमध्ये याआधी डेल्टा प्लस विषाणूची बाधा झालेले २ रुग्ण आढळले होते. त्यातील एक रुग्ण गोरखपूर व दुसरा रुग्ण देवरिया जिल्ह्यात सापडला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल