शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गरबा बघायला आला म्हणून केलेल्या मारहाणीत गुजरातमध्ये दलित तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 11:27 IST

पटेल समाजाच्या तरूणांनी या दलित युवकाला गरबा पाहण्यापासून हटकले आणि मारहाण केली असा आरोप असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजयेश सोळंकी हा युवक आपला भाऊ व मित्रांसह एका मंदीराजवळ गरबा बघण्यासाठी आला होतायावेळी एक तरूण आला आणि त्यानं जातिविषयक आक्षेपार्ह शिवीगाळ जयेशला केलीदलितांना गरबा बघण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्याला मारहाण केल्याचा आरोप

गांधीनगर - गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यामध्ये गरबा बघायला आले म्हणून एका दलित युवकाला मारहाण करून त्याची हत्या केल्याचे वृत्त आहे. पटेल समाजाच्या तरूणांनी या दलित युवकाला गरबा पाहण्यापासून हटकले आणि मारहाण केली असा आरोप असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रविवारी हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. जयेश सोळंकी हा युवक आपला भाऊ व मित्रांसह एका मंदीराजवळ गरबा बघण्यासाठी आला होता. यावेळी एक तरूण आला आणि त्यानं जातिविषयक आक्षेपार्ह शिवीगाळ जयेशला केली. पटेल समाजाच्या या तरुणाने नंतर आणखी काही जणांना बोलावले. दलितांना गरबा बघण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध पुन्हा जातीविषयक गरळ ओकण्यात आली.

यावेळी या तरुणांनी जयेशला मारहाणही केली, त्याचे डोके भिंतीवर आपटले. जयेशला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, परंतु तिथेच नंतर त्याचा मृत्यू झाला. हा पूर्वनियोजित हल्ला नव्हता असे पोलीसांनी सांगितले आहे. सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. जयेशमध्ये व आरोपींमध्ये पूर्ववैमनस्यही नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्या अंगांनी या दुर्घटनेचा विचार करण्यात येत असल्याचे पोलीस म्हणाले.

याआधी केवळ मिशा ठेवल्या म्हणून दोन दलितांना राजपूत समुदायाच्या लोकांनी गांधीनगरमध्ये मारहाण केली होती. याआधी गाईला मारल्याचा चुकीचा आरोप ठेवत चार दलितांना गुजरातमध्ये मारहाण करण्यात आली होती. दलितांचे रक्षण करण्यास गुजरातमधील भाजपा सरकारला अपयश आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून