गरम कढईच्या भांड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:03+5:302015-02-16T23:55:03+5:30
गरम कढईच्या भांड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

गरम कढईच्या भांड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू
ग म कढईच्या भांड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू नागपूर : गरम कढईच्या भांड्यात पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. ही हृद्रयद्रावक घटना गिट्टीखदान परिसरातील गौतमनगर येथे घडली. भूमी मनोज कोडापे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. गेल्या शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भूमी घरी खेळत होती. दरम्यान गरम कढईचे भांडे ठेवले होते. खेळता खेळता चिमुकली भांड्यात पडून गंभीर भाजली. तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री १० वाजता तिचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.