विषारी दारू प्यायल्यानं दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:56 IST2017-07-22T17:56:16+5:302017-07-22T17:56:16+5:30

विषारी दारूचं सेवन केल्यानं दोन जणांना जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे.

The death of both of them by drinking poisonous liquor | विषारी दारू प्यायल्यानं दोघांचा मृत्यू

विषारी दारू प्यायल्यानं दोघांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

कोझिकोड (केरळ), 22 - विषारी दारूचं सेवन केल्यानं दोन जणांना जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. कोझिकोडपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुन्नामंगलम येथील ही घटना आहे. 
 
कुन्नामंगलम येथील पोलीस अधिका-यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अन्य दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर कोझिकोड येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, बलान (वय 54 वर्ष ) व संदीप (वय 37 वर्ष ) या दोघांचा विषारी दारुच्या सेवनामुळे मृत्यू झाला आहे. या दोघांनी शुक्रवारी रात्री अन्य चार जणांसोबत मिळून विषारी दारूचं सेवन केले होते. 
 
दारूच्या सेवनानंतर या चौघांना अस्वस्थ वाटू लागल्यानं सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, बलानचा वाटेतच मृत्यू झाला तर संदीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका खासगी हॉस्पिटलमध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करणा-या संदीपनं ही दारू आणली होती, अशी माहिती समोर आली आहे. 
 
पोलिसांनी सांगितले की, विषारी दारूच्या सेवनानंतर प्रकृती गंभीर असलेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत, तर अन्य दोघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील पोलीस चौकशी सुरू आहे. 
 

Web Title: The death of both of them by drinking poisonous liquor