निधन वार्ता : बापू झाडगे
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:20+5:302015-08-27T23:45:20+5:30
केडगाव : नाथाचीवाडी येथील बापू झाडगे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राहू सोसायटीचे सचिव रामदास झाडगे यांचे ते वडील होत.

निधन वार्ता : बापू झाडगे
म ुकर पिचड यांची माहिती नाशिक : गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरू झालेले आंदोेेलन पाहता त्याची धग आता महाराष्ट्रातही लागत असून, धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण देऊ नये, तसेच केळकर समितीच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मुद्यांवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली. आदिवासी समाजाच्या घटनादत्त आरक्षणात इतर कोणत्याही (धनगर, कोष्टी, कोळी) समाजाला घालण्यासाठी केंद्र सरकारने शिफारस करू नये, राजकीय हेतुसाठी आरक्षण देण्यात येऊ नये, त्यांना इतर कोणतेही आरक्षण दिल्यास आमची हरकत नाही. भारतीय घटनेने आदिवासींचे हितकर्ते म्हणून राज्यपालांना विशेष अधिकार दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील एक कोटी पाच लाख १० हजार २१३ खर्या आदिवासींचे मूलभूत हक्कांचे संरक्षण करावे, तसेच राज्य सरकारने समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नावरील उच्चस्तरीय समिती श्री. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केली होतीे. या समितीने केलेल्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच राज्यभरातील आदिवासी विकास विभागांतर्गतच्या वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये अद्यापही अनेक आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिंनींना प्रवेश मिळत नाही. बहुतांश आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये पोषण आहारासह अनेक बाबींमध्ये विद्यार्थ्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासर्व प्रश्नांबाबत लवकरच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, के. के. सोनवणे, विनायक माळेकर, कैलास शार्दुल, सोनिया जावळे, विशाल माळेकर, बबलू चव्हाण आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)