धक्कादायक! हनीमून ठरला जीवघेणा, फोटोशूट करताना कपलचा मृत्यू; 1 जूनला झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:07 AM2023-06-12T10:07:36+5:302023-06-12T10:07:56+5:30

हनीमूनला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हनीमून जीवघेणा ठरला आहे.

deadly honeymoon chennai couple drowned during photoshoot in bali married on june 1 | धक्कादायक! हनीमून ठरला जीवघेणा, फोटोशूट करताना कपलचा मृत्यू; 1 जूनला झालेलं लग्न

धक्कादायक! हनीमून ठरला जीवघेणा, फोटोशूट करताना कपलचा मृत्यू; 1 जूनला झालेलं लग्न

googlenewsNext

बालीमध्य़े हनीमूनला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हनीमून जीवघेणा ठरला आहे. चेन्नईतील कपल फोटोशूटसाठी वॉटरबाईकवरून जात असताना बुडालं. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 1 जून रोजी त्यांचा थाटामाटात विवाह झाला होता आणि त्यानंतरच ही दु:खद घटना घडली आहे.  पती लोकेश्वरनचा मृतदेह शुक्रवारी तर पत्नी विबुश्नियाचा मृतदेह शनिवारी सापडला.

रिपोर्ट्सनुसार, कपल हनीमून दरम्यान फोटोशूटसाठी बीचवर पोहोचलं होतं. त्यानंतर वॉटरबाईक चालवण्याचा विचार केला आणि तोल गेल्याने दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती देताना बालीचे अधिकारी सांगतात की, केवळ प्राथमिक तपास झाला आहे. त्यानुसार या जोडप्याला वॉटरबाईकवर फोटोशूट करायचे होते, त्याच दरम्यान त्यांना तोल राखता आला नाही आणि दोघेही समुद्रात बुडाले. 

दोघांनाही भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, दोघांच्या कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे जेणेकरून त्यांचे मृतदेह लवकर भारतात आणता येतील. इकडे पालकांची अवस्था वाईट झाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर ही घटना घडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: deadly honeymoon chennai couple drowned during photoshoot in bali married on june 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.