शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड जोडणीची मुदत 31 मार्च 2018 वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 14:56 IST

विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जोडणीची मुदत आता  31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली -  विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जोडणीची मुदत आता 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारने ही माहिती दिली आहे.  दरम्यान, यापूर्वी 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला आव्हान देणा-या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, 'आधार कार्ड सक्तीचा निर्णय मागे घेऊ शकत नाही. केंद्र सरकार यावर चर्चा करण्यास तयार आहे,' असे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले. दरम्यान, या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी 5 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात येईल, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले आहे.

आधार कार्ड जोडणी कराच, अन्यथा हे होणार तोटे

आधारकार्ड पॅनकार्डशी करा लिंक  आधारकार्डचा नंबर पॅनकार्डशी लिंक करणं सरकारने बंधनकारक केलं आहे. आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर आयटी रिटर्न फाइल करता येणार नाही. आयटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया होणार नाही.

आधारकार्ड बँक अकाऊंट नंबरशी करा लिंक आधारकार्ड बँक अकाऊंटशी लिंक करणंही सरकारकडून बंधनकारक करण्यात आलं आहे. बँक अकाऊंट नंबर आधारशी लिंक नसेल तर खातेधारकाचं अकाऊंट ब्लॉक केलं जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील हा तोटा टाळण्यासाठी तुमचा अकाऊंट नंबर आधारकार्ड नंबरशी लिंक करा.

म्युच्युअल फंडात पैसे गुंतविणाऱ्यांनीही करा आधार लिंक  म्युच्युअल फंडात ज्यांनी पैसे गुंतविले आहेत त्यांनाही आधार लिंक करणं सक्तीचं आहे. तसं न केल्यास तुमचं म्युच्युअल फंडाचं खातं गैर ठरवलं जाणार आहे. ज्याचं आधारकार्ड लिंक नसेल त्यांचं खातं नॉन ऑपरेटेबल होणार आहे.

इन्श्युरन्स पॉलिसी धारकांनीही करा आधारकार्ड लिंक  इन्श्युरन्स पॉलिसी धारकांनाही आधारकार्ड लिंक करणं गरजेचं आहे. तसं न केल्यास इन्श्युरन्स पॉलिसीचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.

पोस्टाशी संबंधित काम    पोस्टाशी संबंधित गोष्टी म्हणजेच पीपीएफ, केव्हीपी, ठेवी अशा विविध सुविधांसाठी आधारकार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. अन्यथा खातेधारकाचं खातं ब्लॉक होणार आहे.

मोबाइल नंबर करा आधारकार्डशी लिंक मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक करणं बंधनकारक आहे.  तसं न केल्यास तुमचा मोबाइल नंबर डीअॅक्टीवेट केला जाईल.

एलपीजी, पेन्शन सारख्या सुविधांसाठी आधार कार्ड लिंक सक्तीचं  एलपीजी, पेन्शन यासारख्या सरकारी सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे.  आधार लिंक नसेल तर सरकारी योजनांपासून मुकावं लागणार आहे.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डGovernmentसरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी