शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Breaking News: मोठी बातमी! IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ; पण खूप दिवस नाही, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 19:11 IST

IT return filing Deadline : आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती.

नवी दिल्ली : आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती. यावर केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. 

सामान्य लोकांना, नोकरदारांना आयकर भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच ही मुदतवाढ केवळ 12 दिवसांसाठी देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाने याची घोषणा केली. 

 

तर ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना व त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्य़ात आली आहे. 

याचबरोबर जीएसटी भरण्यासही 28 फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे. 

2019-20 (असेसमेंट वर्ष 2020-21) मध्ये जवळपास 43.7 दशलक्ष आयटी रिटर्न 28 डिसेंबरपर्यंच दाखल झाल्याचे आयकर विभागाने मंगळवारी सांगितले होते. 

काहीसा दिलासा...

कोरोना कहरामुळे केंद्र सरकारने विवरणपत्रे सादर करण्याची मुदत ३१ जुलैऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवून दिली होती. वेळेत विवरणपत्रे दाखल न केल्यास अधिक उत्पन्न असलेल्यांना दंड भरावा लागणार होता. मात्र, आमच्या आर्थिक व्यवहारांची दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने व नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे विवरणपत्रे सादर करण्यासाठी सरकारने २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ४० टक्के व्यापारी व मध्यम उद्योजकांनी केली होती. मात्र, केंद्राने केवळ 10 दिवसच वाढ दिल्याने तसेच ज्यांचे ऑडिट करायचे आहे त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे.  देशातील सुमारे ४१ टक्के छोट्या व मध्यम व्यापारी, तसेच उद्योजकांनी अद्याप विवरणपत्रे सादर केलेली नाहीत. 

प्राप्तिकर परताव्याचा दावा कसा करावा?

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय