पुरात वाहत गेलेल्यांचे मृतदेह आढळले.

By Admin | Updated: August 15, 2015 00:27 IST2015-08-15T00:27:30+5:302015-08-15T00:27:30+5:30

नागपूर : नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहत गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले.

The dead bodies of the victims were found. | पुरात वाहत गेलेल्यांचे मृतदेह आढळले.

पुरात वाहत गेलेल्यांचे मृतदेह आढळले.

गपूर : नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहत गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले.
गिट्टीखदानमधील गंगानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या शामाबाई छन्नुलाल नागपुरे (वय ४०) या गुरुवारी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या.. इंदिरानगर झोपडपट्टी, दिल्ली रेल्वेलाईनच्या जवळ त्यांचा मृतदेह आढळला. छन्नुलाल बुधरलाल नागपुरे (वय ४२) यांच्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
अशाच प्रकारे काचीपुरा येथून वाहून गेलेल्या मुलूकराज भिवाजी मसराम (वय ३१) यांचा मृतदेह कोतवाली हद्दीत भोला गणेश चौकाजवळ, नागनदीच्या पाण्यात आढळला. मेघराज भिवाजी मसराम (वय ४५) यांच्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
---

Web Title: The dead bodies of the victims were found.