शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भयावह, भयानक, भीषण! गंगा नदीजवळ वाळूत अनेक मृतदेहांचं दफन; स्थानिकांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 16:23 IST

उत्तर प्रदेशच्या उन्नवमध्ये अनेक मृतदेहांचं दफन गंगा नदीच्या किनारी केलं जातंय. यामुळे स्थानिक चिंतेत आहेत

उन्नव: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला असून दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात देशात दिवसाला ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मागील आठवड्याच्या तुलनेत परिस्थितीत काहीशी सुधारणा असली तरी देशातील मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये भीषण परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहत आले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील भीषण वास्तव समोर आलं आहे.सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंतपूर्वांचल आणि बिहारमध्ये गंगा नदीत मृतदेह आढळून आल्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमधील प्रशासनानं हात वर करत जबाबदारी एकमेकांवर ढकलली. यानंतर आता उत्तर प्रदेशच्या उन्नवमधील एक भयानक दृश्य समोर आलं आहे. गंगा नदीच्या पात्रात असलेल्या वाळूत दोन ठिकाणी काही मृतदेह दफन करण्यात आले आहेत. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याची भीती स्थानिकांनी वर्तवली आहे.कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा?शुक्लागंज हाजीपूरच्या रौतापूरमध्ये गंगा घाट आहे. या ठिकाणी असलेल्या वाळूमध्ये अनेक मृतदेह दफन करण्यात आले आहेत. या ठिकाणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडं कमी पडत असल्यानं काही हिंदू धर्मीयांनी पार्थिवांना अग्नी न देता ते दफन केल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रौतापूर घाट परिसरात गेल्या २० दिवसांपासून अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बुधवारी या ठिकाणी १६ जणांवर अंत्यसंस्कार झाले. त्यापैकी १३ जणांचे मृतदेह वाळूत दफन केलेल्या स्थितीत होते. पिपरी, लंगडापुरवा, मिर्झापूर, भटपुरवा, राजेपूर, कनिकामऊ यासह अनेक गावांमधील लोक इथे अंतसंस्कारांसाठी येतात.