बिहारमधील आरा येथील काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही वेळातच कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. काँग्रेसचे प्रभारी सचिव बिहार आणि छत्तीसगड भिलाईचे आमदार देवेंद्र प्रसाद यादव यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं, यात दरम्यान काँग्रेस कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाला.
काही वेळातच परिस्थिती इतकी बिघडली की कार्यकर्ते थेट एकमेकांच्या जीवावर उठले. या घटनेत माजी आमदार अजय सिंह जखमी झाले आहेत. कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते आपापसातच हाणामारी करताना दिसत आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांमधील वाद आणि हाणामारीचा हा व्हिडीओ धक्कादायक आहे. लोक एकमेकांचे कपडे ओढत मारताना दिसत आहेत. यात दरम्यान माजी आमदार अजय सिंह यांच्या गटातील एका कार्यकर्त्याचं डोकं फुटलं आहे. एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये कार्यकर्त्याच्या डोक्यातून रक्त वाहताना दिसत आहे.
काँग्रेस कार्यालयात घडलेल्या या घटनेने पक्षाच्या अंतर्गत कारभाराची पोलखोल झाली आहे. ज्या पद्धतीने कार्यकर्ते आपापसात भांडत आहेत ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.