शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कफ सिरपबाबत DCGI चा मोठा निर्णय; 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 16:24 IST

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कफ सिरप वापरण्यास बंदी घातली आहे. यासोबतच DCGI ने औषधांवर लेबल लावण्याचे आदेशही दिले आहेत.

DCGI on Cough Syrup: मागील काही काळापासून भारतात बनवलेल्या कफ सिरपची चर्चा सुरू आहे. या कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा काही देशांनी केला आहे. आता या कफ सिरपबाबत ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने(DCGI) ने मोठा निर्णय घेतलाय. DCGI ने 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कफ सिरप वापरण्यास बंदी घातली आहे. यासोबतच DCGI ने औषधांवर लेबल लावण्याचे आदेशही दिले आहेत.  DCGI ने 18 डिसेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन, या दोन औषधांचा वापर करुन बनवलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबल लावण्यास सांगितले आहे. DCGI ने पत्रात म्हटले आहे की, औषधामध्ये क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन किती प्रमाणात वापरण्यात आले आहे, हे पॅकेजिंगवर लिहणे बंधनकारक असेल.

या औषधांच्या मिश्रणातून तयार केलेले सिरप किंवा गोळ्या सामान्य सर्दीवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात. 2022 मध्ये भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे गांबिया, उझबेकिस्तान इत्यादी देशांमध्ये नोंदवली गेली होती. 2022 मध्ये मेडेन फार्माच्या 4 सिरपमुळे सुमारे 70 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 

यातील बहुतांश मुलांचे वय 5 वर्षाखालील होते. एका भारतीय कंपनीने बनवलेल्या कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे गांबिया सरकारने केलेल्या तपासणीत आढळून आले होते. याशिवाय, भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तान सरकारनेही केला होता. यामुळे आता DCGI ने हा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयmedicineऔषधं