डीबीए कक्षाचे सील काढले
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30
डीबीए कक्षाचे वादग्रस्त सील काढले

डीबीए कक्षाचे सील काढले
ड बीए कक्षाचे वादग्रस्त सील काढलेनागपूर : जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यालयातील एका कक्षाचे गेल्या तीन दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले सील गुरुवारी नवीन कार्यकारिणीच्या उपस्थितीत निवडणूक समिती आणि ज्येष्ठ वकिलांनी काढून घेतले. सील लावण्यात आलेल्या या कक्षात पार पडलेल्या निवडणुकीच्या मतपत्रिका होत्या. मतपेट्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत त्यात पुन्हा हेरफेर होऊ नये म्हणून पराभूत उमेदवार ॲड. वंदन गडकरी, ॲड. सुचिता डोंगरे, ॲड. श्यामनयन अभ्यंकर, ॲड. ए. ए. भेंडारकर, ॲड. सी. डी. राऊत आणि ॲड. राजकुमारी राय, अशा सहा जणांच्या स्वाक्षरीनिशी माजी अध्यक्ष ॲड. सुदीप जयस्वाल यांनी हा कक्ष २७ जानेवारी रोजी सील केला होता. सील लावण्याची ही कृती बेकायदेशीर असल्याने निवडणूक समितीचे अध्यक्ष ॲड. के. बी. आंबिलवाडे, ॲड. पी. जी. देशपांडे, ॲड. एस. डी. गढिया, ॲड. प्रभाकर मारपकवार, ॲड. अर्चना रामटेके, ॲड. विशाखा मेश्राम, ॲड. कलीम, ज्येष्ठ वकील ॲड. अ. म. रणदिवे, ॲड. बी. के. पाल, माजी सरचिटणीस ॲड. मनोज साबळे यांनी काढून घेतले. या वेळी नवीन अध्यक्ष ॲड. प्रकाश जयस्वाल, सरचिटणीस ॲड. नितीन तेलगोटे, उपाध्यक्ष ॲड. प्रशांत भांडेकर, ॲड.अक्षय समर्थ, अन्य पदाधिकारी नचिकेत व्यास, ॲड. नीलेश गायधने, ॲड. श्रीकांत गौळकर, ॲड. गिरीश खोरगडे आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. सील असलेल्या कक्षातील मतपेट्यांना पुन्हा सील लावून त्या त्याच कक्षात ठेवण्यात आलेल्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेले आहे. कॅप्शन-- डीबीए कक्षाचे सील काढून घेताना निवडणूक समितीचे अध्यक्ष ॲड. बी. के. आंबिलवाडे आणि ज्येष्ठ वकील ॲड. रणदिवे