मायावतींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणा-या दयाशंकर यांना अटक
By Admin | Updated: July 29, 2016 15:23 IST2016-07-29T14:22:18+5:302016-07-29T15:23:42+5:30
मायावतींची शरीरविक्रीय करणा-या महिलांबरोबर तुलना करणारे भाजपचा निलंबित नेते दयाशंकर सिंहला उत्तरप्रदेश-बिहार सीमेवरील बक्सर येथून अटक झाली आहे.

मायावतींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणा-या दयाशंकर यांना अटक
ऑनलाइन लोकमत
बक्सर, दि. २९ - मायावतींची शरीरविक्रीय करणा-या महिलांबरोबर तुलना करणारे भाजपचे निलंबित नेते दयाशंकर सिंहला उत्तरप्रदेश-बिहार सीमेवरील बक्सर येथून अटक झाली आहे. उत्तरप्रदेश आणि बिहार पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दयाशंकर यांना अटक केली.
बसपा प्रमुख मायावती यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरणा-या दयाशंकर सिंह यांच्यावर भाजपाने कडक कारवाई केली असून, त्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दयाशंकर सिंह उत्तरप्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते.
या मुद्यावरून मायावती यांनी राज्यसभेत भाजपाला धारेवर धरताना दयाशंकर सिंहला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. दयाशंकर सिंह यांच्या विधानाबद्दल अरुण जेटली यांनीही खेद व्यक्त केला.