दसऱ्याच्या दिवशी येथे होते लंकाधीशाची पूजा
By Admin | Updated: October 12, 2016 05:47 IST2016-10-12T05:47:14+5:302016-10-12T05:47:14+5:30
दसऱ्याच्या दिवशी देशभर रावणदहन केले जाते. तथापि, कानपूर जिल्ह्यातील दशानन मंदिरात मात्र वेगळे चित्र असते. तेथे लोक रांगा लावून लंकेश्वराचे दर्शन घेतात

दसऱ्याच्या दिवशी येथे होते लंकाधीशाची पूजा
कानपूर : दसऱ्याच्या दिवशी देशभर रावणदहन केले जाते. तथापि, कानपूर जिल्ह्यातील दशानन मंदिरात मात्र वेगळे चित्र असते. तेथे लोक रांगा लावून लंकेश्वराचे दर्शन घेतात. शिवाला परिसरातील हे मंदिर १२५ वर्षे जुने आहे.
‘दसऱ्याच्या दिवशी बहुतांश लोक रावणाच्या प्रतिमांचे दहन करीत असताना आम्ही मात्र लंकाधीशाची पूजाअर्चा करतो. महाराज गुरुप्रसाद शुक्ल यांनी १८९० मध्ये हे मंदिर बांधले होते. या मंदिराचे दरवाजे केवळ दसऱ्याच्या दिवशीच भाविकांसाठी उघडले जातात, असे मंदिराचे कामकाज पाहणारे के.के. तिवारी यांनी सांगितले. रावण हा उच्च विद्याविभूषित आणि प्रकाड पंडित असण्यासह महादेवाचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे हे मंदिर उभारण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. दरवर्षी दसऱ्याला पंचक्रोशीतील भाविकांनी दशानन मंदिर फुलून जाते. (वृत्तसंस्था)