दाऊद इब्राहीम कराचीतून पसार
By Admin | Updated: October 28, 2014 02:10 IST2014-10-28T02:10:37+5:302014-10-28T02:10:37+5:30
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीम याला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी भारत व अमेरिका यांनी संयुक्त प्रय} करण्याचा निर्णय घेताच पाकिस्तानने त्याला कराचीतून हलविले असल्याचे वृत्त आहे.

दाऊद इब्राहीम कराचीतून पसार
नवीन सिन्हा - नवी दिल्ली
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीम याला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी भारत व अमेरिका यांनी संयुक्त प्रय} करण्याचा निर्णय घेताच पाकिस्तानने त्याला कराचीतून हलविले असून, पाकिस्तान-अफगाण सीमेवरील दुर्गम जागी लपविले असल्याचे वृत्त आहे.
दाऊदच्या डी कंपनीच्या हालचालीवर नजर ठेवून असणा:या वरिष्ठ सुरक्षा अधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार कराचीतील क्लिफ्टन भागात राजेशाही निवासस्थानात राहणा:या दाऊद इब्राहीमला पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संघटनेने हलवले असून, पाक-अफगाण सीमेवर अज्ञात ठिकाणी ठेवले आहे. दाऊदवर लक्ष ठेवून असणा:या भारतीय अधिका:यांना दाऊदने तळ हलविल्याच्या बातम्या काही दिवसांपासून मिळत होत्या.
दाऊद नव्या ठिकाणी पूर्ण भूमिगत झाला आहे. आपल्या जवळच्या साथीदारांशीही तो बोलत नाही वा कुठेही दिसल्याचे वृत्त नाही. भारत व अमेरिकेने दहशतवाद्यांशी, त्यातही दाऊदशी संयुक्तपणो लढण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेला धक्का बसला असून, आता आपले काही खरे नाही अशी भावना वाढीस लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दाऊदला अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहे.
भारताची भूमिका
पाकिस्तान आतार्पयत दाऊदचे प्रत्यार्पण टाळत असून दाऊदला भारताच्या ताब्यात द्यावे , केवळ दाऊदच नव्हे तर पाकिस्तानात आश्रय घेणा:या सर्व आरोपींना स्वाधीन करावे असेही भारताचे म्हणणो असून, दाऊदच्या हालचालीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे खास लक्ष आहे. डोवल यांनी या महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या अधिका:यांशी चर्चा केली होती. त्यात दाऊदला अज्ञात स्थळी हलविल्याचा मुद्दा समोर आला.
दाऊदचा शोध संयुक्तरीत्या घेणो ही भारत-अमेरिका सहकार्याची कसोटी आहे. दाऊदला शोधण्यात अमेरिकेची प्रमुख भूमिका असून, त्याअंतर्गतच दाऊद कंपनीचे आर्थिक स्रोत गोठविण्यात आले आहेत.
मुंबईतील 1993 च्या दहशतवादी
हल्ल्याचा दाऊद हा मुख्य सूत्रधार आहे, त्याचे व्यापारी संबंध जगात अनेक देशात पसरले आहेत. अरब अमिरात, आफ्रिका व पाकिस्तान ही त्याची प्रमुख गुंतवणुकीची ठिकाणो आहेत.
4भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात दहशतवाद्यांची आश्रयस्थाने उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच अल काईदा, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहंमद व दाऊद कंपनी यांचा आर्थिक स्रोत, पाठिंबा व आश्रय देणारी स्थाने, तसेच नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
4दरम्यान, 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात 25क् हून अधिक जणांचा जीव गेला होता, तर 7क्क् हून अधिक जण जखमी झाले होते.