दाऊद आणि मुंबई पोलिसांचे साटेलोटे - छोटा राजन

By Admin | Updated: November 3, 2015 09:31 IST2015-11-03T09:19:38+5:302015-11-03T09:31:32+5:30

मुंबई पोलिसांनी माझ्यावर खूप अत्याचार केले असून पोलिस दलातील काही अधिका-यांच्या साथीने दाऊदने माझ्याविरोधात कट रचल्याचा खळबळजनक दावा कुख्यात डॉन छोटा राजनने केला आहे.

Dawood and Mumbai Police's Sartelote - Chhota Rajan | दाऊद आणि मुंबई पोलिसांचे साटेलोटे - छोटा राजन

दाऊद आणि मुंबई पोलिसांचे साटेलोटे - छोटा राजन

ऑनलाइन लोकमत

बाली, दि. ३ - मुंबई पोलिसांनी माझ्यावर खूप अत्याचार केले असून पोलिस दलातील काही अधिका-यांच्या साथीने दाऊदने माझ्याविरोधात कट रचल्याचा खळबळजनक दावा कुख्यात डॉन छोटा राजनने केला आहे. दिल्लीतील केंद्र सरकारने माझ्यावर अन्याय होऊ देऊ नये अशी मागणीही त्याने केली आहे. 

छोटा राजन सध्या इंडोनेशियातील बाली पोलिसांच्या ताब्यात असून त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छोटा राजनने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. मुंबई पोलिस दलातील काही जण दाऊदशी मिळाले आहेत असा आरोप राजनने केला. माझ्यावरील सर्व केसेस खोट्या आहेत असा दावाही त्याने केला. मी कोणत्याही दाऊदवैगेरेला घाबरत नाही. २२ वर्षांपासून दहशतवाद व दाऊदविरोधात लढतोय असेही त्याने नमूद केले. दिल्ली की मुंबईत जायचंय असा प्रश्न विचारला असता राजन म्हणाला, सरकार जिथे मला ठेवेल तिथे मी राहायला तयार आहे. फक्त माझ्यावर अन्याय होऊ देऊ नये. 

Web Title: Dawood and Mumbai Police's Sartelote - Chhota Rajan