दाऊद, आयएसआयविरुद्ध पुरावे देणार
By Admin | Updated: October 30, 2014 00:33 IST2014-10-30T00:33:19+5:302014-10-30T00:33:19+5:30
भारत सरकार या परिषदेत आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या भूमिकेबद्दलचे पुरावे करून संयुक्त आंतरराष्ट्रीय कारवाई करण्याचे आवाहन करेल, अशी माहिती गृहमंत्रलयाच्या अधिका:याने दिली.

दाऊद, आयएसआयविरुद्ध पुरावे देणार
नबिन सिन्हा - नवी दिल्ली
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला आश्रय देण्यासह भारतातील विविध दहशतवादी संघटनांना आयएसआयकडून मिळणारी मदत आणि प्रशिक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी भारत सरकार अमेरिकेत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पोलीस प्रमुख संघटनांच्या परिषदेत आपले उच्चधिकार प्रतिनिधी मंडळ पाठविणार आहे.
इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) प्रमुख आसिफ इब्राहिम हे या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करतील. हे उच्चधिकार प्रतिनिधी मंडळ जमात-उद-दवाचा हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबाचा झकिऊर रहमान लखवी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासारखे दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांकडून केल्या जाणा:या दहशतवादी कारवायांबद्दलचे ठोस पुरावे या परिषदेत सादर करण्याची शक्यता आहे.
भारत सरकार या परिषदेत आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या भूमिकेबद्दलचे पुरावे करून संयुक्त आंतरराष्ट्रीय कारवाई करण्याचे आवाहन करेल, अशी माहिती गृहमंत्रलयाच्या अधिका:याने दिली. या जागतिक परिषदेत आयबीचे प्रमुख आसिफ इब्राहिम यांच्यासह जवळपास शंभरावर देशांचे गुप्तचर संस्थाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. आसिफ इब्राहिम हे 26/11 चा मुंबई हल्ला आणि हाफिज सईद व लखवी यांची भूमिका याबाबतचे पुरावे सोबत घेऊन जाणार आहेत. पाकने आजवर दिलेली सर्व आश्वासने कशी फोल ठरली आहेत आणि हे दहशतवादी आजही पाकिस्तानमध्ये मोकळे फिरत आहेत, याचा पुरावा या दस्तऐवजात असेल.