शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चंदनतस्कर वीरप्पनची मुलगी भाजपवासी; दोन वर्षांपासून होती ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 12:04 IST

वीरप्पन आणि मुथ्थुलक्ष्मी यांना दोन मुली आहेत. विद्याराणी ही मोठी तर प्रभा ही धाकटी. विद्याराणी ही 29 वर्षांची आहे.

ठळक मुद्देमुथ्थुलक्ष्मी सध्या तामिळनाडूच्या सेलमध्ये त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत.तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश झाला. वीरप्पनच्या शोधासाठी पोलिस आणि निमलष्करी दलांना त्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तीस वर्षांचा काळ लागला होता.

चेन्नई : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनची मुलही विद्याराणीने शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला. विद्याराणी ही वकील आहे. सत्तेत असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव मुरलीधर राव यांनी तिला सदस्य बनविले. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी राधाकृष्णन यांनी भाजपाचा पट्टा घालून पक्षात सहभागी केल्याचे घोषित केले. 

वीरप्पन आणि मुथ्थुलक्ष्मी यांना दोन मुली आहेत. विद्याराणी ही मोठी तर प्रभा ही धाकटी. विद्याराणी ही 29 वर्षांची आहे. मुथ्थुलक्ष्मी सध्या तामिळनाडूच्या सेलमध्ये त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत. तसेच वीरप्पनला मदत केल्यामुळे पोलिसांनी त्रास दिलेल्या लोकांनाही त्या मदत करत आहेत. 

वीरप्पनच्या शोधासाठी पोलिस आणि निमलष्करी दलांना त्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तीस वर्षांचा काळ लागला होता. एक दोन नाही तर तीन राज्यांचे पोलिस त्याच्या मागावर होते. यासाठी त्यांना 20 कोटींहून जास्त खर्च आला होता. 

या प्रवेशावर विद्याराणीने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांना मी भेटले होते. तेव्हा त्यांनी भाजपामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. यावर मी विचार करत होते. कोणत्याही जाती-धर्माची पर्वा न करता शिक्षणाद्वारे लोकांचा विकास करायचा आहे. कृष्णागिरीमध्ये सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी गेल्या वर्षापासून शाळा चालवित आहे. मोदींच्या लोककल्याणकारी योजनामुळे प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपाPoliceपोलिस