शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदिपक कामगिरी! आईच्या एका शिकवणीने लेक झाली IAS; दबंग अधिकारी म्हणून आहे ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 14:53 IST

स्वातीने यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले होते, त्यामुळे त्यांनीही तिला खूप पाठिंबा दिला.

राजस्थानमध्ये जन्मलेल्या स्वाति मीणा यांचे शिक्षण अजमेरमध्ये झाले आहे. मुलीने डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती. स्वाती यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनाही यावर काही आक्षेप नव्हता, पण आठवीत असताना आईची एक चुलत बहीण अधिकारी झाली होती. स्वातीच्या वडिलांना भेटायला आल्यावर वडील खूप आनंदी दिसत होते. त्यानंतर त्यांनी वडिलांना UPSC बद्दल विचारले आणि अधिकारी होण्याचे ठरवले.

वडिलांनी पाहिले की स्वाती यांनी यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले होते, त्यामुळे त्यांनीही तिला खूप पाठिंबा दिला. स्वाती यांच्या कुटुंबात यापूर्वीही अनेक अधिकारी होते. आई पेट्रोल पंप चालवायची. वडील स्वाती यांची तयारी करत राहिले. 2007 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत मुलीने ऑल इंडिया रँक 260 मिळवला तेव्हा मेहनतीचे फळ मिळाले. स्वाती त्या बॅचच्या सर्वात तरुण IAS होत्य़ा. UPSC उत्तीर्ण झाल्यावर त्यांना मध्य प्रदेश कॅडर मिळालं. स्वाती यांच्या आईने शिकवले की तिच्या वाटेत कितीही अडचणी आल्या तरी तिने हार मानू नये. 

नोकरीच्या काळात स्वाती यांची प्रतिमा दबंग अधिकारी अशी राहिली आहे. स्वाती मध्य प्रदेशातील मंडला येथे तैनात असताना खाण माफियांचा तेथे मोठा पगडा होता. स्वाती तिथे पोहोचल्यावर या खाण माफियांविरोधात मोहीम उघडली. त्या सांगतात की, जेव्हा ती कलेक्टर म्हणून मंडलाला पोहोचली तेव्हा खाण माफियांबद्दल अनेक विभागांकडून तक्रारी आल्या. त्याआधारे त्यांनी कारवाई केली. त्याचप्रमाणे त्यांचा खांडव्यातील कार्यकाळही अत्यंत आव्हानात्मक होता. 

मारल्या गेलेल्या सिमीच्या दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या परिसरात पोहोचल्यावर हल्लेखोरांनी वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनासह स्वाती मीणा यांनी हे आव्हानात्मक काम सहज पार पाडले. दसऱ्याच्या दरम्यान पोलीस लाईनमध्ये होणाऱ्या शस्त्रपूजेदरम्यान एके-47 मधून हवाई गोळीबार केल्याने स्वाती मीणाही चर्चेत आली होती. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी