शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'डाटाचा गैरवापर खपवून घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 00:22 IST

रविशंकर प्रसाद यांचा इशारा; देशात डाटा विश्लेषणाचे आगार बनवण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली : भारताला डाटा विश्लेषणाचे आगार बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे; परंतु लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी डाटाचा गैरवापर अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा आयटी व कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला.सीबीआयने फेसबुक, केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका व ग्लोबल सायन्स रिसर्च या संस्थांना पत्र लिहून डाटा संकलन व्यवस्थेची माहिती मागितली.या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, भारत डाटा विश्लेषण क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र बनावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु या डाटाचा वापर लोकशाहीवर प्रभाव टाकण्यासाठी कंपन्या करीत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. स्वच्छता अभियानातील एका कार्यक्रमात प्रसाद म्हणाले की डाटा फुटीप्रकरणी फेसबुकने याआधीच माफी मागून सुधार कृती करण्याचे आश्वासन दिले आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने सुरुवातीला उत्तर दिले होते, नंतर मात्र कंपनीकडून काहीही प्रतिसाद नाही. त्यामुळे हे प्रकरण आम्ही तपासासाठी सीबीआयकडे पाठविले आहे.मागवला खुलासावर्षाच्या सुरुवातीला ८७ लाख वापरकर्त्यांचा डाटा फुटल्याप्रकरणी फेसबुक व केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाविरुद्ध क्षोभ निर्माण झाला होता. जगभरातील सरकारांकडून याबाबत कंपन्यांवर टीकेची झोड उठली होती.फेसबुक युजर्सचा डाटा अनेक देशांतील निवडणुकांसाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. सावध झालेल्या भारत सरकारने दोन्ही कंपन्यांना नोटिसा बजावलेल्या होत्या. सीबीआयनेही आता या कंपन्यांकडून त्यांचे म्हणणे मागविले आहे.

टॅग्स :Internetइंटरनेट