शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

६१ लाख भारतीयांचा डेटा विक्रीला, फोन नंबरसह एरियाचा कोड होतंय सेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 08:09 IST

हॅकर्स विकत आहेत फोन नंबरसह एरियाचा कोड

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हॅकर्सनी जगभरातील ४८७ दशलक्ष म्हणजेच २५ टक्के व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा हॅक करून तो इंटरनेटवर विक्रीसाठी ठेवला आहे. यातील ६१.६२ लाख फोन नंबर भारतीयांचे आहेत. या डेटात फोन नंबर, देशाचे नाव व एरिया कोडचा समावेश आहे.

१६ नोव्हेंबर रोजी विक्रीसाठी ठेवलेल्या डेटामध्ये ८४ देशांतील नागरिकांची माहिती आहे. या डेटाच्या खाली हॅकर्सनी एक संदेश लिहिला आहे.‘आज मी या व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा बेस विकत आहे. हा २०२२ चा सर्वात ताजा डेटा आहे. म्हणजेच तुम्ही तो विकत घेतल्यास, तुम्हाला नवीन सक्रिय मोबाइल वापरकर्ते मिळतील,’  असे या संदेशात म्हटले आहे. यामुळे नागरिकांच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फसवणुकीचा धोकाहॅकिंगचा सर्वात मोठा धोका फिशिंग आणि फसवणुकीचा आहे. व्हॉट्सॲप आणि बँकिंग सेवांशी संबंधित क्रमांक एकच असलेले लोक याला मोठ्या प्रमाणावर बळी पडू शकतात. दोन्ही कामांसाठी एकच नंबर वापरला जात आहे. याशिवाय या क्रमांकांद्वारे वापरकर्त्यांच्या ओळखीचा दुरुपयोग करून दुसऱ्याची फसवणूक केली जाऊ शकते.

इजिप्तमध्ये सर्वाधिक, भारत २५ व्या क्रमांकावर डेटा हॅक झालेल्या ८४ देशांच्या वापरकर्त्यांपैकी सर्वाधिक ४.४८ कोटी इजिप्तमधील आहेत. यानंतर इटलीचे ३.५६ कोटी, अमेरिकेचे ३.२३ कोटी, सौदी अरेबियाचे २.८८ कोटी, तर फ्रान्समधील १.९८ कोटी वापरकर्ते आहेत. हॅक झालेल्या वापरकर्त्यांच्या यादीत भारत २५ व्या क्रमांकावर आहे.

टाळण्यासाठी सेटिंग्जमध्ये बदल कराअनोळखी व्यक्ती हे नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करून तुमचा प्रोफाईल फोटो, स्टेट्स, माहिती, ऑनलाइन असण्याची माहिती, प्रोफाईल नाव इत्यादी पाहू शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘कॉन्टॅक्ट ओन्ली’मध्ये प्रायव्हसी बदलू शकता. याद्वारे, जे लोक तुमच्या संपर्कात आहेत तेच उल्लेख केलेल्या गोष्टी पाहू शकतील.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई