शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नरेंद्र मोदी, सीतारामन यांच्याविरुद्ध हक्कभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 03:48 IST

राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीबाबत सभागृहाची हेतूपुरस्सर दिशाभूल केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस

नवी दिल्ली : फ्रान्सकडून खरेदी करायच्या राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीबाबत सभागृहाची हेतूपुरस्सर दिशाभूल केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस काँग्रेस पक्षाने मंगळवारी दिली.काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खरगे यांनी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून ही नोटीस दिली व ती स्वीकारून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे सोपवावी, अशी विनंती केली.मोदी सरकारने राफेल विमानांची किंमत चारपट वाढवून दिली आहे, असा काँग्रेसचा आरोप असून सरकारने विमानांची किंमत जाहीर करावी, अशी पक्ष सातत्याने मागणी करत आहे. लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेतही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही मागणी केली होती. मात्र मोदी व सितारामन यांनी फ्रान्ससोबत झालेल्या करारातील गोपनीयतेच्या कलमाचे कारण सांगून किंमत जाहीर करता येणार नाही, असे उत्तर दिले होते. मात्र वस्तुत: त्या करारातील गोपनीयतेचे कलम विमानांच्या किंमतीला लागू नाही. तरीही मोदींनी त्या कलमाचा चुकीचा संदर्भ देऊन दिशाभूल केली, असा आरोप खरगे यांनी पत्रात केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBJPभाजपाcongressकाँग्रेस