मुलीची कंबर पकडून नाचणं पडलं महागात, 1 वर्षाचा तुरुंगवास
By Admin | Updated: February 2, 2017 16:15 IST2017-02-02T16:15:56+5:302017-02-02T16:15:56+5:30
लग्न समारंभ किंवा सार्वजनिक उत्सवांमध्ये कोणा मुलीसोबत बळजबरीने नाचणं पडणार महागात

मुलीची कंबर पकडून नाचणं पडलं महागात, 1 वर्षाचा तुरुंगवास
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 2 - लग्न समारंभ किंवा सार्वजनिक उत्सवांमध्ये कोणा मुलीसोबत बळजबरीने नाचणं आता महागात पडू शकतं. अशाच एका घटनेत छत्तीसगडच्या विलासपूर जिल्हा न्यायालयाने आरोपीला एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, 5 फेब्रुवारी 2015ची ही घटना आहे. या दिवशी मुंडा गावातील पंचायत निवडणुकींचे निकाल लागले होते. त्यामध्ये धर्मेंद्र बाई यांची सरपंचपदी निवड झाली. संध्याकाळी गावात विजयोत्सव साजरा करण्यात आला. महिला उमेदवार जिंकल्यामुळे विजयोत्सवात अनेक तरूण मुलीही सहभागी झाल्या होत्या. नाच-गाणं सुरू असताना या दरम्यान दिनेश खांडे नावाच्या एका तरूणाने एका मुलीची कंबर पकडली आणि नाचायला लागला. मुलीने याचा विरोध केला, पण आरोपी तिच्यासोबत नाचण्यासाठी बळजबरी करू लागला. त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पिडीतेने पोलिस स्थानकात तक्रार केली.
तक्रारीनुसार आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. दीडवर्षानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी धरत एक वर्षाची शिक्षा सुनावली आणि दंडही भरण्यास सांगितलं.