दोन कुंटणखान्यांवर धाडी
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:05+5:302015-02-21T00:50:05+5:30
तीन दलालांना अटक : तीन तरुणींची रवानगी सुधारगृहात

दोन कुंटणखान्यांवर धाडी
त न दलालांना अटक : तीन तरुणींची रवानगी सुधारगृहातनागपूर : देहव्यवसाय सुरू असलेल्या शहरातील दोन पॉश कुंटणखान्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने धाड टाकून तीन दलालांना अटक केली आहे तर तीन तरुणींची या व्यवसायातून सुटका करून, त्यांची महिला सुधार गृहात रवानगी करण्यात आली. हा देहव्यापार अनेक दिवसांपासून सुरु होता, अशी पोलिसांची माहिती आहे. झटपट पैसा मिळविण्यासाठी शहरात देहव्यवसाय चांगलाच फोफावला आहे. शहरातील लक्ष्मीनगर व वैशालीनगर या वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या देहव्यवसायावर सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी धाड टाकली. वैशालीनगरात वर्षा सुनील वानखेडे (३४) ही महिला घरीच कुंटणखाना चालवित असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून २ हजारात सौदा केला. वर्षाने एका २४ वर्षीय युवतीला बोलावून घेतले. तिकडे सामाजिक सुरक्षा पथकाचे कर्मचारी तैनात होते. बनावट ग्राहकाकडून संकेत मिळाल्याबरोबरच पथकाने धाड घालून वर्षा वानखेडेला अटक केली. वर्षा गेल्या ६ वर्षापासून या व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दुसरी घटना लक्ष्मीनगरातील इंद्रनील अपार्टमेंटमध्ये घडली. हिरालाल शंकरलाल गुप्ता (५८) याने अपार्टमेंटच्या तळमजल्यावर देहव्यवसायासाठी फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्याला इंदोरा येथील नेहा ऊर्फ बरखा देवीदास काबळे (३५) ही महिला या व्यवसायात मदत करीत होती. याप्रकरणाचीही माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली असता, शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता बनावट ग्राहक पाठवून ६ हजारात सौदा केला. नेहाने २५ व ४० वर्षाच्या दोन महिलांना बोलावून घेतले. लगेच पथकाने धाड टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले तर नेहा कांबळे व हिरालाल गुप्ता याला अटक केली. दोन्ही प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही दलालांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (पिटा) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन महिलांना सुधार गृहात पाठविले आहे. अटक करण्यात आलेला हिरालाल गुप्ता हा ठाकूर नावाने या व्यवसायात गेल्या १० वर्षापासून सक्रिय होता, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या नेतृत्वात, अमिता जयपूरकर, पांडुरंग निकुरे, अस्मिता मेश्राम, मंदा गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.