रावेर तालुक्यात ९६ हेक्टरवर नुकसान

By Admin | Updated: February 29, 2016 22:02 IST2016-02-29T22:02:25+5:302016-02-29T22:02:25+5:30

जळगाव : रावेर तालुक्यात रविवार २८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे गुलाबवाडी, मोरव्हाल व पाल येथील ९५.९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Damage to 96 hectares in Raver Taluka | रावेर तालुक्यात ९६ हेक्टरवर नुकसान

रावेर तालुक्यात ९६ हेक्टरवर नुकसान

गाव : रावेर तालुक्यात रविवार २८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे गुलाबवाडी, मोरव्हाल व पाल येथील ९५.९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
रविवार २८ रोजी रावेर तालुक्यातील गुलाबवाडी, मोरव्हाल व पाल या तीन गावांमध्ये गारपीट व वादळी पाऊस झाला. गुलाबवाडी गावातील टोमॅटोचे १४.५ हेक्टर, कांद्याचे १२ हेक्टर व गव्हाचे ५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मोरव्हाल गावातील टोमॅटोचे ८ हेक्टर, कांद्याचे ७ तर गव्हाचे ४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाल येथील टोमॅटोचे ११.४० हेक्टर, कांद्याचे २२ आणि गव्हाचे १२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहेत. याबाबतचे पंचनामे रावेर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत.

Web Title: Damage to 96 hectares in Raver Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.