धरण उशाला; कोरड घशाला !
By Admin | Updated: November 4, 2015 00:24 IST2015-11-03T23:44:56+5:302015-11-04T00:24:22+5:30
सलिम सय्यद, अहमदपूर : शहरातील पाणीपुरवठा करणार्या लिंबोटी धरणात बर्यापैकी पाणीसाठा असताानासुद्धा नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात पालिकेच्या नळाला २० ते २२ दिवसाला पाणी येत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अहमदपूर तालुक्याला वरदान ठरलेल्या लिंबोटी धरणामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. परंतु, शहराला २० ते २२ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

२० ते २२ दिवसाला एकदा पाणी येत असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांची गैरसोय होत आहे. शहराला लिंबोटी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. लिंबोटी धरणात मुबलक पाण्याचा साठा असूनही शहराला २० ते २२ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराला कमीत कमी २ ते ४ दिवसाला पाणीपुरवठा करावा, अशी जनतेची मागणी आहे. एकेकाळी अहमदपूर तालुका कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असे. माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचनाची कामे हाती घेतल्याने संपूर्ण तालुक्याचाच कायापालट झाला आहे. तालुक्याला वरदान ठरलेल्या लिंबोटी धरणामुळे परिसराचा कायापालट झाला आहे. माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी अहमदपूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे. परंतु, नियोजनाअभावी अहमदपूरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.