शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला दालमिया समूहाला दिला दत्तक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 22:26 IST

देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी जेथे तिरंगा ध्वज फडकावतात तसेच देशाला उद्देशून भाषण करतात तो दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला सरकारने दालमिया भारत समूहाला २५ कोटी रुपयांत ५ वर्षांसाठी (वर्षाला ५ कोटी रुपये) दत्तक दिला आहे.

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी जेथे तिरंगा ध्वज फडकावतात तसेच देशाला उद्देशून भाषण करतात तो दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला सरकारने दालमिया भारत समूहाला २५ कोटी रुपयांत ५ वर्षांसाठी (वर्षाला ५ कोटी रुपये) दत्तक दिला आहे. मोगल बादशहा शहाजन याने १७ व्या शतकात हा किल्ला बांधलेला आहे. दालमिया भारत समूह सिमेंट उत्पादक असून, ऐतिहासिक वास्तू दत्तक घेणारा तो देशातील पहिला उद्योग समूह ठरला आहे. ‘अपनी धरोहर, अपनी पहचान’ या योजनेंतर्गत लाल किल्ला दत्तक देण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २७ सप्टेंबर २0१७ रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून या योजनेची घोषणा केली होती. पर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व विभागासोबत कंपनीने गेल्या मंगळवारी यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

दालमिया समूहाने आंध्र प्रदेशातील कडापा जिल्ह्यातील गंडीकोटा किल्लाही दत्तक घेतला आहे. पुनीत दालमिया यांच्या नेतृत्वाखालील दालमिया समूहाला लाल किल्ला दत्तक घेण्यासाठी इंडिगो एअरलाईन्स आणि जीएमआर समूहाशी स्पर्धा करावी लागली. ‘वारसास्थळे दत्तक देणे ही पर्यटन मंत्रालयाची अनोखी कल्पना असून, आम्ही भारतीय वारसा स्थळांना मौल्यवान करण्याचे प्रयत्न करू’, असे पुनीत दालमिया यांनी सांगितले.

दत्तक करारानुसार, लाल किल्ल्याची देखभाल, संवर्धन आणि सुशोभीकरण करणे तसेच परिसराचे नूतनीकरण करणे या जबाबदाºया दालमिया समूहावर राहतील. किल्ल्याला भेट देणा-यांकडून शुल्क वसूल करून महसूल मिळविण्याचा हक्कही कंपनीला राहील.एकूण २२ ऐतिहासिक वारसा स्थळे दत्तक देण्याची सरकारची योजना आहे. जगप्रसिद्ध ताजमहालही या यादीत आहे. जीएमआर स्पोर्टस् आणि आयटीसी हे उद्योग समूह ताजमहाल दत्तक घेण्यास उत्सुक असल्याचे समजते.

 

 

टॅग्स :Red Fortलाल किल्ला