शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नात खुर्चीवर बसून जेवल्यानं दलित तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:37 IST

अद्याप आरोपींना अटक नाही

देहरादून: लग्नात खुर्चीवर बसून जेवल्यानं उच्चवर्णीयांनी केलेल्या मारहाणीत दलित तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तेहरी गरहवाल तालुक्यातल्या श्रीकोटमध्ये घडली. या मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू झाला. 26 एप्रिलला ही घटना घडली. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. 'हिंदुस्तान टाईम्स'नं हे वृत्त दिलं आहे.26 एप्रिलला जितेंद्र दास एका लग्नाला होता. त्यावेळी काही उच्चवर्णीयांनी जितेंद्रला मारहाण केली. याबद्दलची माहिती जितेंद्रच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबाला दिली. सात जणांनी जितेंद्रला लग्नात मारहाण केली. त्यानंतर जितेंद्र तिथून निघाला. मात्र त्या सात जणांनी त्याचा पाठलाग केला आणि पुन्हा मारहाण केली, असं जितेंद्रचे काका इलम दास यांनी सांगितलं. 'त्या रात्री जितेंद्र लग्नात जेवत होता. त्यावेळी आमच्याच भागात राहणाऱ्या सात जणांनी त्याला शिवीगाळ केली. आम्ही उभे असताना आमच्यासमोर बसून कसा काय जेवतोस, असा प्रश्न विचारत त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या सात जणांनी जितेंद्रला जातीवाचक शिवीगाळदेखील केली,' असं दास यांनी सांगितलं. मारहाणीमुळे जितेंद्रच्या डोक्याला आणि गुप्तांगाला जबर दुखापत झाली होती, अशी माहिती त्याचा भाऊ प्रितम दासनं दिली. जबर मारहाणीनंतर जितेंद्र कसाबसा घरी पोहोचला. मात्र त्यानं याबद्दलची माहिती कुटुंबीयांना दिली नाही. त्या रात्री तो घराबाहेरच झोपला. सकाळी तो कुटुंबाला बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. यानंतर जितेंद्रच्या बहिणीनं पोलिसात तक्रार दाखल केली. मारहाण करणाऱ्या सात जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि एससी/एसटी अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती नरेंद्र नगरचे पोलीस अधिकारी उत्तम सिंह यांनी दिली. या प्रकरणात कोणीही साक्षीदार पुढे आलेला नाही. मात्र आता जितेंद्रचा मृत्यू झाल्यानं सात आरोपींना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात येईल, असं सिंह म्हणाले.  

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाण