dalit atrocity man parading naked chamrajnagar karnataka | धक्कादायक! मंदिरात आलेल्या दलित तरुणाला नग्नावस्थेत फिरवलं 
धक्कादायक! मंदिरात आलेल्या दलित तरुणाला नग्नावस्थेत फिरवलं 

चामराजनगरः कर्नाटकात दलित अत्याचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकताल्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये पुजारी आणि ग्रामस्थांनी एका दलित तरुणाला शनिश्वर मंदिरात नग्नावस्थेत फिरवलं. तो दलित तरुण देवाच्या मूर्तीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण 3 जून रोजीचं आहे. 

घटनेसंदर्भात मंदिरातले पुजारी चंद्रप्पा म्हणाले, तो मंदिरात आला तेव्हा मी त्याला पाणी दिलं. त्याला मंदिरात यायचं होतं. मी त्याला बोलावलं पण त्यानं माझी कॉलर पकडली. कारण नसताना मला शिवीगाळ करू लागला. तो मंदिरात आला तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते. मी त्याला लुंगी दिली. असं वाटत होतं की, त्याची मानसिक परिस्थिती ठीक नाही. तर दुसरीकडे तरुणाच्या भावानं पुजारी आणि ग्रामस्थांनी त्याला नग्नावस्थेत फिरवल्याचं म्हटलं आहे.


त्यानंतर पीडित मुलाचा भाऊ कांता राजू याच्या तक्रारीवर भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 395, 323, 342 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पुजारी आणि एका स्थानिकाला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी फरार आहेत. जमावानं त्या दलित तरुणाला मारहाणही केली, तो तरुण परीक्षेसाठी म्हैसूरला गेला होता. त्याचदरम्यान राघवपूर गावात त्याच्या बाइकला अपघात झाला आणि त्याला तिकडेच लुटण्यात आलं. त्यानंतर तो मंदिरात गेला आणि ही दुर्घटना घडली. त्या तरुणाच्या वडिलांनी एक प्रमाणपत्र दिलं असून, त्यात तरुण मानसिक रुग्ण असल्याचं म्हटलं आहे.

 


Web Title: dalit atrocity man parading naked chamrajnagar karnataka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.