अंध मुलांकडून दहिहंडीत फुलांचा वर्षाव
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30

अंध मुलांकडून दहिहंडीत फुलांचा वर्षाव
>पुणे: राज्यात सध्या दुष्काळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पावसाअभावी पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दहिहंडीमध्ये पाण्याऐवजी फुलांचा वापर करणे कौतुकास्पद आहे. मला दहीहंडी उत्सवासाठी मुंबई आणि ठाण्यातून अनेक आमंत्रणे आली होती. पण अंध मुलांचा विधायक दहीहंडीचा उपक्रम आवडल्याने, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.राज्यातील दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन अंध मुलांनी पाण्याऐवजी फुलांच्या वर्षावात दहिहंडी फोडून नवा आदर्श निर्माण केला. या विधायक उपक्रमाची पोचपावती म्हणून अंध मुलांच्या संस्थेला भाजपचे रणजित चव्हाण आणि मोरेश्वर बालगुडे यांनी एक लाख रूपयांचे बक्षिस दिले. यावेळी दानवे बोलत होते.पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजासह सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी भाजपाचे रणजित चव्हाण आणि मोरेश्वर बालगुडे यांनी कोरेगाव पार्कमधील अंध शाळेत विधायक दहीहंडी साजरी केली. यावेळी फुलांच्या वर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भाजापाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,खासदार अमर साबळे, ़ख़ासदार संजय पाटील,पोलिस उपायुक्त पी.आर.पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार जगदिश मुळीक, मुरली मोहोळ, रवि अन्नापुरम, शिवम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अभय नवलडे यांनी सूत्रसंचालन केले. हर्षल जगताप, निलेश तापकीर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केलेे. फोटो: कोरेगाव पार्कमध्ये अंध मुलांनी विधायक दहीहंडी फोडली.फोट : प्रज्ञा लॉगिनला ०७दहिहंडी------------------------------------