दादरी हत्याकांड - अखलाकच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल
By Admin | Updated: July 15, 2016 20:42 IST2016-07-15T20:42:06+5:302016-07-15T20:42:06+5:30
उत्तर प्रदेशमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अखलाकच्या कुटुंबियांविरोधात दादरी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

दादरी हत्याकांड - अखलाकच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - उत्तर प्रदेशमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अखलाकच्या कुटुंबियांविरोधात दादरी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी विजयकुमार यांनी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल करून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गुरुवारी पोलिसांना दिले होते. त्यानुसार, आज एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक अनुराग सिंग यांनी दिली. तर, कोर्टाच्या आदेशानुसार अखलाकच्या नातेवाईकांविरोधात एफआयआर दाखल केला असून आम्ही या प्रकरणीची नि:पक्ष चौकशी करु असे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) दलजित सिंग चौधरी यांनी सांगितले.
बिसाडामधील काही नागरिकांनी अखलाकच्या कुटुंबीयांनी गोमांस बाळगल्याच्या संशयावरून सीआरपीसीनुसार कलम 156(3) अंतर्गत कोर्टाकडे कारवाई करण्याची मागणी केली होती.