पश्चिम बंगालमध्ये दीदीच बनणार दादा ! तृणमूलची निर्विवाद आघाडी
By Admin | Updated: May 19, 2016 12:33 IST2016-05-19T09:22:34+5:302016-05-19T12:33:06+5:30
पश्चिम बंगालमध्ये दीदी ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसचीच सत्ता कायम रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पश्चिम बंगालमध्ये दीदीच बनणार दादा ! तृणमूलची निर्विवाद आघाडी
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - पश्चिम बंगालमध्ये दीदी ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसचीच सत्ता कायम रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकीचे ठरवले आहेत. त्यांच्या पक्षाची सत्ता येईल असा अंदाज एक्झिट पोलनी वर्तवला होता. पण दोन-तृतीयांश इतके बहमुत मिळवून सत्तेत येतील असे कुठल्याही एक्झिट पोलने म्हटले नव्हते.
सध्याच्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार तृणमुल २१० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेसने डावे, काँग्रेस, भाजपचा पार धुव्वा उडवला आहे. डावे आणि काँग्रेस मिळून ६० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने २०११ इतक्याच जागा कायम राखल्या आहेत. पराभव ख-या अर्थाने डाव्यांचा झाला आहे.
डाव्यांनी मागच्यावेळी ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांच्या जागा ३५ पेक्षाही खाली गेल्या आहेत. केंद्रात सत्तेवर असणा-या भाजपने ममता बॅनर्जी यांची शारदा चिंटफंड घोटाळा, पूल दुर्घटनेवरुन प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झालेला नाही. भाजपसाठी समाधानाची बाब म्हणजे त्यांचे उमेदवार १० जागांवर आघाडीवर आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार तृणमुल काँग्रेसचे १८४, काँग्रेस ४२, सीपीआय (एम) ४० आणि सीपीआयचे दोन आमदार आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी तृणमुल काँग्रेस ३४, काँग्रेस चार आणि डाव्यांना दोन जागांवर विजय मिळाला होता.