सर्वोच्च न्यायालयात एक असा प्रकार घडला, जो पाहून न्यायमूर्तींपासून ते वकिलांपर्यंत सर्वच स्तब्ध झाले. खरे तर, एका 12 वर्षांच्या मुलीच्या कस्टडीसाठी न्यायालयात पती-पत्नीचा वाद सुरू आहे. दरम्यान या मुलीने आपल्या वडिलांसोबत राहण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली. "मला सोबत ठेवायची इच्छा असेल, तर १ कोटी रुपये द्यावे लागतील," अशी मागणी मुलीने आपल्या वडिलांकडे केली आहे. मुलीची ही मागणी ऐकूण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवईही थक्क झाले आणि त्यांनी या संपूर्ण प्रकारावरून, मुलीच्या आईलाच सुनावले.
मुलीचं डोकं बिघडवू नका... -एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मुलीने आपल्या वडिलांकडे १ कोटी रुपयांची मागणी करताच, सरन्यायाधीश बीआर गवई संतापले आणि त्यांनी तिच्या आईला फटकारले. सरन्यायाधीश म्हणाले, मुलीचे डोके बिघडवू नका आणि तिला अशा प्रकारे प्रोत्साहन देऊ नका. सरन्यायाधीश पुढे म्हणाले, आई आपल्या मुलीला चुकीच्या मार्गावर गेऊन जात आहे. मुलीच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरवत आहे. तसेच, मुलीने योग्य पद्धतीने विचार करावा आणि समजून घ्यावे. तिने तिच्या वडिलांवर पैशासाठी दबाव आणू नये, अशी न्यायालयाची इच्छा आहे. न्यायालय हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे.
वडिलांचे वकील काय म्हणाले? -वडिलांच्या वतीने वरिष्ठ वकील पीआर पटवालिया यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. ते म्हणाले, संबंधित दाम्पत्यात वैवाहिक वाद सुरू होता. यानंतर, जिल्हा न्यायालयाने मुलीची कस्टडी वडिलांना दिली होती. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या आदेशाला आईकडून आव्हान देण्यात आले अशून ते सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, तिने मुलीची कस्टडी वडिलांना दिलेली नाही.
आईने शाळेच्या रेकॉर्डवरूनही काढलं वडिलांचं नाव - पटवाली म्हणाले, आता बघा काल काय झालं? कालच, मुलीने माझ्यासोहत येण्यास नकार दिला आणि ती म्हणत आहे की, 'आपण माझ्या आईला त्रास देत आहात. आपण अवमानना खटला दाखल केला आह. आपण एक कोटी रुपये द्या आन्यथा मी येणार नाही.' याशिवाय आईने शाळेच्या रेकॉर्डवरूनही वडिलांचे नाव हटवले आहे. तसेच, पटवारीया यांनी न्यायालयाकडे आग्रह केला की, आईला दंड करून काही साध्य होणार नाही. या प्रकरणात मध्यस्थी करण्यात यावी.
आईच्या वकीलाचा युक्तीवाद -दरम्यान, मुलीच्या आईची वकील अनुभा अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यालयत उक्तीवाद करणातना म्हटले आहे की, आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत. यावर, मुख्य न्यायाधीश गवई संबंधित मुलीच्या आईला म्हणाले, आपण आपल्या मुलीला अनावश्यकपणे ओढत आहात. आपण आपल्या मुलीचे करीअर खराब करत आहात. तिची डोके बिघडवत आहात. यामुळे एखाद वेळी आपलेच नुकसान होईल. दोन्ही पक्षांच्या संमतीनंतर, हा वाद वैवाहिक वाद आहे, हे पाहून न्यायालयाने हे प्रकरण मध्यस्थाकडे पाठवले.