दिल्लीत सिलिंडरचा स्फोट; तीन ठार
By Admin | Updated: April 18, 2016 22:56 IST2016-04-18T22:54:14+5:302016-04-18T22:56:10+5:30
दिल्लीतील गांधीनगर परिसरात असलेल्या एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

दिल्लीत सिलिंडरचा स्फोट; तीन ठार
ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. १८ - दिल्लीतील गांधीनगर परिसरात असलेल्या एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
गांधीनगर परिसरात असलेल्या गीता कॉलनीमधील इमारतीत सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाल्याचे समजते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
Three dead, 11 injured after a cylinder blast in a building in Gandhinagar area of Delhi pic.twitter.com/tzi0q9mjJr
— ANI (@ANI_news) April 18, 2016