सायकल घोटाळा पूर्वनियोजित !...जोड

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:13+5:302015-07-06T23:34:13+5:30

चौकट...

Cycle scam pre-planned! ... pair | सायकल घोटाळा पूर्वनियोजित !...जोड

सायकल घोटाळा पूर्वनियोजित !...जोड

कट...
नियमबाह्य कामाला सेनेचा विरोध
सायकल खरेदी करताना मुख्यालयात सॅम्पल ठेवण्याची प्रथा होती. परंतु यावेळी सॅम्पल न बघताच कंत्राट देण्यात आले. नियमबाह्य कामाला आमचा विरोध आहे. कोणत्याही साहित्याची खरेदी करताना त्यात पारदर्शकता असायलाच हवी.
शरद डोणेकर
उपाध्यक्ष,जि.प.
चौकट...
पूर्वनियोजित भ्रष्टाचार
एकाच साहित्याची तुकडे पाडून खरेदी करता येत नाही. याची जाणीव असल्याने शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पात एक कोटीच्या सायकल खरेदीसाठी प्रत्येकी ५०-५० लाखाची तरतूद केली. तहकू ब सभेत याला मंजुरी देण्यात आली. ई-टेंडरची गरज भासली नाही. यात शंभर टक्के भ्रष्टाचार झाला आहे. याचा सत्ताधाऱ्यांना जाब विचारू.
मनोहर कुंभारे
विरोधी पक्षनेते, जि.प.
...
चौकट...
सॅम्पल बघायलाच हवे
पक्षाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. सायकल खरेदी करताना शिक्षण समितीने सॅम्पल बघायला पाहिजे. प्रचलित पद्धतीनुसार खरेदी होईल असे वाटले होते. परंतु याला फाटा देण्यात आला. कोणतीही प्रक्रिया नियमानुसार व्हायला हवी.
विजय देशमुख
सत्तापक्ष नेता, जि.प.
.....
चौकट...
ई-निविदा काढायला पाहिजे
तीन लाखाहून अधिक खरेदी करावयाची असल्यास ई-निविदा काढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहे. याचा विचार व्हायला हवा होता. कंत्राट देण्यापूर्वी सायकलीचे सॅम्पल ठेवायला हवे होते. यात काही त्रुटी आढळल्यास सदस्यांना बदल सुचविता आला असता. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सायकली मिळाल्या असत्या.
संध्या गोतमारे
माजी अध्यक्ष, जि.प.
चौकट...
प्रचलित पद्धतीला फाटा कशासाठी?
साहित्य खरेदीची प्रचलित प्रथा आहे. परंतु सायकल खरेदी करताना याला फाटा देण्यात आला. तीन लाखाहून अधिक खरेदी असल्यास ई-निविदा काढण्याचे शासन धोरण आहे. परंतु पदाधिकाऱ्यांना याची गरज भासली नाही.मागील तीन वर्षाची पद्धती मोडीत काढली. यात भ्रष्टाचाराला वाव आहे.
चंद्रशेखर चिखले
माजी उपाध्यक्ष, जि.प.

Web Title: Cycle scam pre-planned! ... pair