शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

सायकल गर्ल ज्योती पासवानवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 14:18 IST

Cycle Girl Jyoti Paswan: सायकल गर्ल म्हणून देशपातळीवर ओळख झालेल्या ज्योती पासवान या तरुणीचे वडील मोहन पासवान यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

पाटणा - सायकल गर्ल म्हणून देशपातळीवर ओळख झालेल्या ज्योती पासवान या तरुणीचे वडील मोहन पासवान यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ज्योतीच्या कुटुंबीयांनी तिच्या वडलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गतवर्षी लॉकडाऊनला सुरुवात झाल्यावर वडलांना सायकलवर बसवून गुडगांवमधून बिहामधील दरभंगा येथे आणले होते. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेल आली होती. (Cycle Girl Jyoti Paswan's father dies of heart attack) गतवर्षी कडक लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद करण्यात आले होते. त्यावेळी कोरोनाची भीती आणि रोजगार गमावल्यामुळे लाखो लोकांनी शहरातून गावाच्या दिशेने पलायन करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये ज्योतीचाही समावेश होता. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडामधील सिरहुल्ली गावातील १३ वर्षीय ज्योतीने लॉकडाऊनदरम्यान वडील मोहन पासवान यांना सायकलवर बसवून गुडगांव येथून आठ दिवसांचा प्रवास करून दरभंगा येथे आणले होते. 

ज्योतीचे वडील मोहन पासवान यांच्या काकांचे निधन १० दिवसांपूर्वी झाले होते. त्यांचे श्राद्ध कार्य करण्याबाबत बैठक सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर उठून उभे राहत असतानाच मोहन पासवान कोसळले आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. मोहन पासवान यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.  दिल्ली-एनसीआरमध्ये मोहन पासवान हे ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. जानेवारी २०२० मध्ये त्यांचा अपघात झाला होता. तेव्हा ज्योती त्यांची देखभाल करण्यासाठी वडलांकडे आली होती. यादरम्यान, संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाले. तेव्हा केवळ ४०० रुपयांना एक सायकल खरेदी करून ज्योती हिने तिच्या वडिलांना गुडगांव येथून दरभंगा येथे आणले होते. 

टॅग्स :BiharबिहारIndiaभारत