शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

सायबर फसवणूक : 'पिग बुचरिंग स्कॅम'द्वारे गुंतवणुकीचे आमिष; बेरोजगार तरुण, गृहिणी अन् विद्यार्थी टार्गेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:17 IST

हे गुन्हे करण्यासाठी सायबर गुन्हेगार गुगल सर्व्हिस प्लॅटफॉर्मचाही वापर करत आहेत.

नवी दिल्ली : देशात आणखी एक नवीन सायबर घोटाळा उघडकीस आला आहे. यात बेरोजगार युवक, गृहिणी, विद्यार्थी आणि गरजू लोकांना लक्ष्य केले जात आहे आणि ते दररोज मोठ्या प्रमाणात पैसे गमावत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, याला 'पिग बुचरिंग स्कॅम' किंवा 'गुंतवणूक घोटाळा' असेही म्हटले जाते. हे गुन्हे करण्यासाठी सायबर गुन्हेगार गुगल सर्व्हिस प्लॅटफॉर्मचाही वापर करत आहेत.

अहवालानुसार गुगल जाहिरात प्लॅटफॉर्म हा जाहिरातींसाठी एक सोपा मार्ग असतो. ‘पिग बुचरिंग स्कॅम’ किंवा गुंतवणूक घोटाळा म्हणून त्याला जगभरात ओळखले जाते. यात मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग आणि अगदी ‘सायबर गुलामगिरी’ केली जाते.

‘पिग बुचरिंग स्कॅम’ २०१६ मध्ये सुरू झाला असून यात सामान्य नागरिकांना टार्गेट केले जाते. यात भामटे त्यांना जाळ्यात ओढतात आणि त्यांना शेवटी क्रिप्टोकरन्सी किंवा इतर काही आकर्षक योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. यानंतर त्यांची रक्कम हडपली जाते.

व्हॉट्सॲप ठरतोय धोकादायकसायबर गुन्हेगार भारतात बेकायदेशीर कर्ज देणारी ॲप्स सुरू करण्यासाठी फेसबुक तसेच फेसबुकच्या पेजचा वापर करतात आणि त्या तेथून शेअर केल्या जातात. व्हॉट्सॲप हा भारतातील सायबर गुन्हेगारांकडून गैरवापरासाठी वापरले जाणारे सर्वांत मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठरला आहे.

सायबर फसवणूक तक्रारी२०२१    १,३६,६०४२०२२    ५,१३,३३४२०२३    ११,२९,५१९२०२४                       (मार्च २०२४ पर्यंत)    ३,८१,८५४

सायबर गुन्हेगारीच्या तक्रारीप्लॅटफॉर्म    जाने. २४    फेब्रु. २४    मार्च २४व्हॉट्सॲप    १५३५५    १३६९६    १४७४६टेलिग्राम    ८४६२    ६५६७    ७६५१इन्स्टाग्राम    ६७०८    ५९४०    ७१५२फेसबुक    ६५२५    ७१९१    ५०५१यूट्यूब    १५९१    ११५६    ११३६

सायबर क्राइम२०२२ मध्ये ३६.३ टक्के (६५ हजार प्रकरणांपैकी २४,०००) सायबर गुन्ह्यांची प्रकरणे संगणकाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये नोंदवली गेली. यानंतर १७ टक्के प्रकरणे फसवणूक आणि ६,८९६ प्रकरणे ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील/ लैंगिक साहित्याचे प्रकाशन केल्याची आहेत.४,२९,१५२ मोबाइल नंबर ब्लॉक करण्यात आले आहेत.६९,९२१ मोबाइल बंद लॉक करण्यात आले आहेत.

१३२ कोटी रुपये केंद्र सरकारने सायबर फॉरेन्सिक लॅब आणि इतर संबंधित खर्चासाठी दिले आहेत.

सायबर फसवणुकीच्या तक्रारीएप्रिल २०२३ - १०२५५२ऑक्टोबर २३ - १३८२६१फेब्रुवारी २४ - १४१२७४जुलै २३ - १११९८१जानेवारी २४ - १४६८०३मार्च २४ - १२८०३१ 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस