शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नुपूर शर्मा वादानंतर भारतावर सायबर हल्ले, 2000हून अधिक वेबसाइट हॅक; क्राइम ब्रँचची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 17:48 IST

मलेशिया आणि इंडोनेशियातील मुस्लिम हॅकर्स ग्रुपने भारतावर सायबर हल्ले सुरू केले आहेत. अहमदाबाद क्राइम ब्रँचने याबाबत माहिती दिली.

नवी दिल्ली: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या पैगंबरांवरील वक्तव्यानंतर मोठा वाद झाला. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. यादरम्यान एक मोठी माहिती समोर येत आहे. अहमदाबाद क्राइम ब्रँचने म्हटले की, नुपूर शर्माच्या घटनेनंतर मलेशिया आणि इंडोनेशियातील मुस्लिम हॅकर्सनी भारताविरुद्ध सायबर हल्ले सुरू केले आहेत.

ड्रॅगन फोर्स मलेशिया आणि हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या दोन हॅकर गटाकडून हे हल्ले होत आहेत. दोन्ही गटांनी जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर हल्ला करण्याचे आवाहनही केले आहे. अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचने सांगितले की, या हॅकर्स ग्रुपने भारतातील 2 हजारांहून अधिक वेबसाइट हॅक केल्या आहेत.

अनेक माहिती ऑनलाईन लीक झालीहॅकर्सनी नुपूर शर्माचे घर आणि वैयक्तिक माहिती ऑनलाइन टाकली. याशिवाय आसाममधील एका प्रादेशिक वाहिनीवर थेट प्रक्षेपणाच्या मध्यभागी पाकिस्तानचा ध्वज दाखवण्यात आला. हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाईटही हॅक केली. एवढेच नाही तर आंध्र प्रदेश पोलिसांची वैयक्तिक माहितीही देण्यात आली. लोकांचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड ऑनलाईन लीक झाले.

सायबर क्राईमने मलेशिया आणि इंडोनेशिया सरकारला पत्र लिहिलेअहमदाबाद सायबर क्राइमने यासंदर्भात मलेशिया आणि इंडोनेशिया सरकारला पत्र लिहिले आहे. पत्रात अहमदाबाद सायबर क्राईमने दोन्ही गटांसाठी इंटरपोल लुकआउट नोटिसचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने झाली. उदयपूरमध्ये एका शिंप्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. याशिवाय अरब देशांमध्येही मोठा विरोध पाहायला मिळाला. अरब देशांमध्येही अनेक ठिकाणी भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या आल्या.

नुपूर शर्मावर देशातील अनेक शहरांमध्ये एफआयआर दाखलवादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्माविरोधात देशातील अनेक शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत म्हटले आहे की, नुपूरवर दाखल झालेले गुन्हे वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत, ते सर्व एकत्र दिल्लीला वर्ग करण्यात यावे. पण सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावत नुपूरवर जोरदार टिप्पणी केली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndonesiaइंडोनेशियाMalaysiaमलेशिया