शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसनं आजवर तुम्हाला खूप दिलं, आता पक्षाचा विचार करा", सोनिया गांधी कार्यकारिणी बैठकीत स्पष्टच बोलल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 09:06 IST

राजकारणात वाईट दिवस सुरू असलेला काँग्रेस पक्ष आता अॅक्शन मोडमध्ये आला आहे. काँग्रेसचं तीन दिवसीय चिंतन शिबीर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली-

राजकारणात वाईट दिवस सुरू असलेला काँग्रेस पक्ष आता अॅक्शन मोडमध्ये आला आहे. काँग्रेसचं तीन दिवसीय चिंतन शिबीर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची (CWC) बैठक पार पडली. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. 

सोनिया गांधी यांनी यावेळी उदयपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या चिंतन शिबीरात जवळपास ४०० सहकारी सहभागी होणार असल्याचं सांगितलं. यातील बहुतांश नेते पक्षात विविध महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. या शिबीराआधी सोनिया गांधी यांनी नेत्यांना संबोधित करताना काँग्रेस पक्षानं आजवर तुम्हाला खूप काही दिलं आहे. आता पक्षाच्या कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली आहे, असं स्पष्टच सांगितलं. 

"आपल्या सर्वांसाठी आता काँग्रेस पक्षानं केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी आजवर महत्वाची पदं उपभोगली आहेत. आता तुम्ही पक्षाचा विचार केला पाहिजे. अर्थातच पक्षातील त्रृटींवर भाष्य करणं आणि टीका करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण स्वपक्षावर केलेल्या टीकेमुळे पक्षातील इतर नेत्यांचा आत्मविश्वासाला तडा जाईल आणि नकारात्मक वातावरण तर तयार होत नाही ना? याचा विचार करायला हवा", असं सोनिया गांधी म्हणाल्या. 

चिंतन शिबीरात पक्षातील समन्वय आणि संतुलन राखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. यात एकूण सहा समूहांमध्ये चर्चा केली जाईल, असंही सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितलं. राजकारण आणि संघटनात्मक गोष्टींसोबतच आर्थिक, सामाजिक न्याय, शेतकरी, युवा या मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल, असं सोनिया गांधी म्हणाल्या. 

भाजपाचा विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह नाहीचिंतन शिबिरात CWC चे सदस्य, विशेष आमंत्रित सदस्य, प्रदेशाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री, सर्व खासदार, CLP नेते, विविध विभागाचे चेअरमन, महिला काँग्रेस, युथ काँग्रेस आणि एनएसयूआयचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर टीका करणं राष्ट्रद्रोह ठरू शकत नाही, असं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले. मोदी सरकारनं जनतेचा आवाज दाबण्याचं काम केलं आहे तसंच राजद्रोहाच्या कायद्याचा दुरुपयोग केला असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस