जीभ कापून मुलाचा नरबळी
By Admin | Updated: September 29, 2014 12:41 IST2014-09-29T12:39:40+5:302014-09-29T12:41:14+5:30
दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्याची घटना ओदिशात घडली आहे.

जीभ कापून मुलाचा नरबळी
बोलनगीर (ओडिशा) : ओडिशाच्या बोलनगीर जिलत सात वर्षाच्या मुलाची जीभ कापून नरबळी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दुष्टशक्तींचा कोप टाळण्यासाठी अंधश्रद्धेपोटी हे कृत्य करण्यात आले.
झालीपदार या गावातील त्या दुर्दैवी बालकाचे नाव दशरथअसून त्याचा मृतदेह जवळच्याच गंध्राबाध येथील एका तळ्यात आढळून आला.
तांत्रिक हृषिकेश दास, बानकाने बेहरा आणि अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. दुष्टशक्तींना दूर ठेवण्यासाठीच हे कृत्य केल्याची कबुली बेहरा याने दिली आहे. तांत्रिक दास याने त्याला हा सल्ला दिला होता.
दशरथ शुक्रवारी घराजवळ खेळत असताना या सर्वांनी त्याला खाऊ देण्याचे आमिष दाखवत बाजूच्या गावी नेले. आरोपींनी त्याचे हात बांधून जीभ कापल्यानंतर त्याला तलावात फेकून दिले.