कस्टम्स आयुक्त, उपायुक्तांना अटक

By Admin | Updated: August 15, 2015 01:35 IST2015-08-15T01:35:21+5:302015-08-15T01:35:21+5:30

प्रत्यक्षात न केल्या गेलेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या तयार कपड्यांच्या निर्यातीच्या बदल्यात ३०० कोटी रुपयांचा सीमाशुल्क परतावा फसवणुकीने दिला गेल्या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर

Customs Commissioner, Deputy Commissioner arrested | कस्टम्स आयुक्त, उपायुक्तांना अटक

कस्टम्स आयुक्त, उपायुक्तांना अटक

नवी दिल्ली : प्रत्यक्षात न केल्या गेलेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या तयार कपड्यांच्या निर्यातीच्या बदल्यात ३०० कोटी रुपयांचा सीमाशुल्क परतावा फसवणुकीने दिला गेल्या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) गुरुवारी सीमाशुल्क आयुक्त अतुल दीक्षित, उपायुक्त नलिन कुमार आणि सहदेव गुप्ता या व्यापाऱ्यास अटक केली.
या तिघांविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला होता. शुक्रवारी दिवसभर जाजबजबाब घेतल्यानंतर संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले. या फसवणुकीच्या व्यवहाराने सरकारचा ७४.६१ कोटींचा महसूल बुडाला व तेवढाच लाभ खासगी व्यापाऱ्यास देण्यात आला, असा आरोप आहे.
महसुली गुप्तवार्ता संचालनालयाने या प्रकरणाचा तपास केला होता. गुप्ता यांनी सादर केलेला ३०० कोटी रुपयांच्या परताव्याचा दावा स्थगित ठेवावा, असे सांगूनही दीक्षित व कुमार यांनी काहीही केले नाही व ही रक्कम गुप्ता यांच्या खात्यात जमा करेली गेली, असे तपासातून निष्पन्न झाले होते. सूत्रांनुसार गुप्ता यांनी वाढीव रकमेच्या बनावट बिलांच्या आधारे वर्ष २०१३-१४ मध्ये हाँगकाँग व दुबई येथील कंपन्यांना आठ हजार कोटी रुपयांचे तयार कपडे निर्यात केल्याची कागदपत्रे सादर करून त्यावर ३०० कोटी रुपयांच्या सीमाशुल्क परताव्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात या कंपन्यांनी त्यांनी हा माल खरेदी केल्याचा इन्कार केला होता.

Web Title: Customs Commissioner, Deputy Commissioner arrested