ग्राहक जनजागृती मोहीम

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:16+5:302015-03-06T23:07:16+5:30

सीजीएसआयतर्फे ग्राहक जनजागृती मोहीम

Customer awareness campaigns | ग्राहक जनजागृती मोहीम

ग्राहक जनजागृती मोहीम

जीएसआयतर्फे ग्राहक जनजागृती मोहीम
मुंबई : एखाद्या उत्पादनाबाबत फसवणूक अथवा एखाद्या कंपनीकडून फसवणूक झाल्यास दाद कुठे मागायची? याबाबतची पुरेशी कल्पना ग्राहकांना नसते. याचाच सारासार विचार करत दी कंझ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया(सीजीएसआय) च्या वतीने ग्राहकांसाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सीजीएसआयचे सचिव डॉ. एम.एस. कामत यांनी याबाबत सांगितले की, पश्चिम उपनगरातील बोरीवली येथे १ मार्च रोजी ग्राहकांच्या जनजागृतीसाठीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचणे हा शिबिराचा उद्देश होता. या शिबिरादरम्यान ग्राहकांकडून २० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. घर विकत घेतले तरी घराचा ताबा मिळाला नाही, ऑनलाईन खरेदी व्यवहार, गृहक्षेत्रातील पगडी सिस्टम आणि त्याचा पुनर्विकास, बँकेकडून झालेली फसवणूक आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून झालेली फसवणूक; अशा अनेक तक्रारींचा यामध्ये समावेश होता. या प्रकरणांत फसवणूक झालेला तक्रारदारांना दिलासा देत पुढे नक्की काय पाऊले उचलावीत; किंवा कशा प्रकारे त्यांना तोंड द्यावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचे सीजीएसआयच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
....................

Web Title: Customer awareness campaigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.