शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

हळदीमधील ‘करक्युमीन’ घटकात आहे कोरोना विषाणू मारक क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:12 IST

‘जर्नल ऑफ जनरल व्हायरॉलॉजी’च्या ताज्या अंकातील माहिती

नवी दिल्ली : भारतीय स्वयंपाक घरात हमखास सापडणाऱ्या हळदीतील ‘करक्युमीन’ या घटकात कोरोना विषाणूला मारण्याची क्षमता असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. ‘जर्नल आॅफ जनरल व्हायरॉलॉजी’ या नियतकालिकाच्या ताज्या अंकात यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सध्याचे संशोधन डुकरात आढळणाºया ‘अल्फा ग्रुप’ कोरोना विषाणूवर करण्यात आले आहे. लवकरच मनुष्यावर तसेच इतर कोरोना विषाणूंवरही यासंबंधीचे संशोधन केले जाणार असल्याचे नियतकालिकात म्हटले आहे.

डुकरांमध्ये पसरणाºया ‘ट्रान्समिसिबल गॅस्ट्रोएंटेराटीस व्हायरस’वर (टीजीईव्ही) हे संशोधन करण्यात आले. शरीरात करक्युमीनचे प्रमाण जितके अधिक, तितका टीजीईव्ही विषाणूचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, असे या संशोधनात आढळून आले आहे.टीजीईव्ही हा विषाणू डुकरांच्या दोन आठवड्यांपेक्षा छोट्या पिलांत पसरतो. विषाणूग्रस्त पिलांना हगवण लागते. त्यात मृत्यूचे प्रमाण प्रचंड असते. या आजारावर लस उपलब्ध असली तरी त्यामुळे विषाणूचा प्रसार थांबत नाही.

‘करम्युमीन’ची विषाणूरोधक शक्ती तपासण्यासाठी संशोधकांनी पेशींना विविध प्रमाणात करम्युमीन दिले. त्यानंतर त्यांना विषाणूग्रस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या पेशीत जास्त प्रमाणात करम्युमीन होते, त्यांच्यात विषाणूचे प्रमाण अत्यंत कमी आढळून आले. करम्युमीन टीजीईव्ही विषाणूला थेटपणे मारते, असाच याचा अर्थ आहे.

1 या संशोधन अहवालाचे लेखक आणि ‘वुहान इन्स्टिट्यूट आॅफ बायोइंजिनिअरिंग’चे संशोधन डॉ. लिलान शी यांनी सांगितले की, टीजीईव्ही विषाणू रोखण्याची मोठी क्षमता करम्युमीनमध्ये असल्याचे दिसून आले आहेत.

2 इतर विषाणूजन्य आजार रोखण्यातही हळदीचा उपयोग होऊ शकतो. यात डेंग्यू, हेपेटायटीस बी आणि झिका या विषाणूंचा समावेश आहे. हळदीत ट्यूमर रोधक गुणही आढळून येतो. जळजळविरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्मही आढळून येतात.

3 डॉ. शी यांनी सांगितले की, हळदीत साईड इफेक्ट नसल्यामुळे आम्ही तिचा संशोधनासाठी स्वीकार केला आहे. प्रभावी लस नसल्यामुळे विषाणूजन्य आजारांचा प्रतिकार करणे ही बाब अत्यंत कठीण होऊन बसली आहे. चीनच्या परंपरात औषधांचा वापर त्यासाठी केला जाऊ शकतो.

4 त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच आम्ही हळदीवर संशोधन सुरू केले आहे. डॉ. शी यांनी सांगितले की, हळदीतील करक्युमीनच्या मनुष्यासह इतर प्राण्यांवर चाचण्या घेण्याची तयारी आम्ही करीत आहोत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या