CSK किंवा BCCI - सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय

By Admin | Updated: December 9, 2014 17:13 IST2014-12-09T16:56:35+5:302014-12-09T17:13:22+5:30

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाने एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचे अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितले आहे.

CSK or BCCI - options before Srinivasan of Supreme Court | CSK किंवा BCCI - सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय

CSK किंवा BCCI - सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ९ -  आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाने एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचे अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितले आहे. तसेच गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही तातडीने कारवाई करावी असे निर्देशही कोर्टाने बीसीसीआयला दिले आहे. 
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नेमलेल्या मुदगल समितीच्या अहवालावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पुन्हा एकदा बीसीसीआयला चांगलेच फटकारले. एन. श्रीनिवासन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाही त्यांनी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीला हजेरी लावण्यावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेरीस श्रीनिवासन यांनी त्यांची चूक मान्य करत कोर्टाची माफी मागितली. यानंतर श्रीनिवासन यांनी कोर्टासमोर पाच पर्यायही दिले. यावर सुप्रीम कोर्टानेच श्रीनिवासन यांच्यासमोर गुगली टाकली अन् बीसीसीआयचे अध्यक्षपद किंवा चेन्नई सुपर किंग्जची मालकी यापैकी एक निवडा असे पर्याय त्यांच्यासमोर मांडले. याप्रकरणाची पुढीव सुनावणी उद्या (बुधवारी) सकाळी साडे दहा वाजता होणार आहे. 
 
श्रीनिवासन यांनी मांडलेले पाच पर्याय 
१ . बीसीसीआयची अंतर्गत शिस्तपालन समिती याप्रकरणात लक्ष घालेल. 
२. बीसीसीआय याप्रकरणी समिती नेमेल. 
३. कोर्टानेच याप्रकरणी शिस्तपालन समिती नेमावी. 
४. कोर्टानेच दोन न्यायाधीशांची समिती नेमावी. 
५ . मुदगल समितीच याप्रकरणी कारवाई किंवा शिक्षा देईल.  

Web Title: CSK or BCCI - options before Srinivasan of Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.