हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला बिलगून रडणाऱ्या मुलाचाही मृत्यू, वडिलांनी लावला नाही हात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 03:32 PM2024-01-12T15:32:38+5:302024-01-12T16:09:40+5:30

आपल्या वृद्ध आईच्या मृत्यूने मुलाला मोठा धक्का बसला. त्याने आईच्या मृतदेहाला बिलगला आणि रडू लागला. पण रडता रडता त्याचा देखील मृत्यू झाला आहे.

crying son dies due to shock of mothers death but father did not touch dead body emotional story | हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला बिलगून रडणाऱ्या मुलाचाही मृत्यू, वडिलांनी लावला नाही हात

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशच्या बदायूंमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या वृद्ध आईच्या मृत्यूने मुलाला मोठा धक्का बसला. त्याने आईच्या मृतदेहाला बिलगला आणि रडू लागला. पण रडता रडता त्याचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. आई आणि मुलगा दोघेही आजारी होते.

उझानी परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. जेथे 65 वर्षीय महिलेचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. मुलगा दीपकला आईच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. त्याने आईच्या मृतदेहाला बिलगला आणि तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याचाही काही वेळाने मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आजारपणामुळे महिलेला आपल्या मुलाची काळजी घेणं शक्य नव्हतं. महिला एक वर्षापासून अंथरुणाला खिळून होती. ती स्वतःची आणि दोन मुलांची काळजी घ्यायची. दीपक आणि कुलदीप हे अनेकदा आजारी असायचे, त्यामुळे आईची काळजी घेण्याऐवजी ते स्वतःच तिच्यावर अवलंबून होते. लहान मुलगा कुलदीप अपंग आहे. 

रात्री आईचा मृत्यू झाला. सकाळी कुलदीपने आईला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ती उठली नाही. आईच्या दु:खाने दोन्ही मुलगे बेशुद्ध झाले आणि सकाळी सातच्या सुमारास दीपक आईच्या मृतदेहाजवळ रडत असतानाच त्याचाही मृत्यू झाला. आईनंतर आमची काळजी कोण घेणार म्हणत दीपक रडत होता. 

या संपूर्ण घटनेदरम्यान मुलांचे वडील बेपत्ता होते. आजूबाजूच्या लोकांनी त्याला बोलावले पण ते घरी आले नाही. आई-मुलाचा मृतदेह घरात असताना वडील घरातून बेपत्ता होते. अंत्यसंस्कार करावे लागू नयेत म्हणून ते घरात आले नाहीत. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ते घरी गेले मात्र अंत्यसंस्कारासाठी तयार नव्हते. 
 

Web Title: crying son dies due to shock of mothers death but father did not touch dead body emotional story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.