रॉयल्टीच्या दरवाढीमुळे क्रशर बंद

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:07+5:302015-07-08T23:45:07+5:30

नागपूर : महसूल व वनविभागाने गौण खनिजावरील रॉयल्टीवर १०० टक्के दरवाढ केली आहे. २०० रुपये प्रति ब्रासचे ४०० रुपये प्रति ब्रास केल्यामुळे क्रशर उद्योगावर मोठे संकट ओढावले आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये आधीच रॉयल्टी जास्त आहे. त्यात शंभर टक्के वाढ केल्याने क्रशर उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ कमी करावी म्हणून ऑरेंज सिटी स्टोन क्रशर्स ऑनर्स असोसिएशनतर्फे महसूलमंत्री, ऊर्जामंत्री त्याचबरोबर या खात्यांच्या प्रधान सचिवांशी पत्रव्यवहार केला. परंतु महिना झाल्यानंतरही कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे जिल्‘ातील सर्व क्रशर्स बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याचे अध्यक्ष रमेश गिरडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

Crushers shut due to the royalties | रॉयल्टीच्या दरवाढीमुळे क्रशर बंद

रॉयल्टीच्या दरवाढीमुळे क्रशर बंद

गपूर : महसूल व वनविभागाने गौण खनिजावरील रॉयल्टीवर १०० टक्के दरवाढ केली आहे. २०० रुपये प्रति ब्रासचे ४०० रुपये प्रति ब्रास केल्यामुळे क्रशर उद्योगावर मोठे संकट ओढावले आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये आधीच रॉयल्टी जास्त आहे. त्यात शंभर टक्के वाढ केल्याने क्रशर उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ कमी करावी म्हणून ऑरेंज सिटी स्टोन क्रशर्स ऑनर्स असोसिएशनतर्फे महसूलमंत्री, ऊर्जामंत्री त्याचबरोबर या खात्यांच्या प्रधान सचिवांशी पत्रव्यवहार केला. परंतु महिना झाल्यानंतरही कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व क्रशर्स बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याचे अध्यक्ष रमेश गिरडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

Web Title: Crushers shut due to the royalties